वृत्तसंस्था, हॅम्बर्ग
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उपांत्यपूर्व फेरीतील संघर्षपूर्ण लढतीत फ्रान्सने पोर्तुगालचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ असा पराभव करत युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. दोन्ही संघांना नियोजित आणि अतिरिक्त वेळेत अभावानेच गोल करण्याच्या संधी निर्माण करता आल्या. त्यामुळे दोन्ही संघ गोलचे खाते उघडण्यात अपयशी ठरले आणि अखेर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लावावा लागला. या सामन्यातील पराभवामुळे जेतेपदासह युरो स्पर्धेला अलविदा करण्याचे कर्णधार ख्रिास्तियानो रोनाल्डो आणि बचावपटू पेपे या पोर्तुगालच्या सर्वांत अनुभवी फुटबॉलपटूंचे स्वप्न अधुरेच राहिले.
शूटआऊटमध्ये फ्रान्सच्या खेळाडूंनी कमालीच्या संयमाने आपल्या सर्व किक यशस्वीपणे मारल्या. पोर्तुगालचीही सुरुवात चांगली होती. मात्र, पेनल्टी मारण्यात खासियत असलेल्या ब्रुनो फर्नांडेसला नियमित वेळेतच मैदानाबाहेर बोलावण्याचा निर्णय पोर्तुगालला महागात पडला. त्याच्या जागी संधी मिळालेल्या जोओ फेलिक्सची किक गोलपोस्टला धडकून परत आली. उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सलग तीन पेनल्टी किक अडवणारा पोर्तुगालचा गोलरक्षक दिओगो कोस्टा उपांत्यपूर्व सामन्यात मात्र निष्प्रभ ठरला. त्याला फ्रान्सच्या खेळाडूंनी सहज चकवले.
हेही वाचा >>>Team India : अर्शदीप सिंगचे मोहालीत ‘ग्रँड वेलकम’, ढोल-ताशांच्या गजरातील जंगी स्वागताचा VIDEO व्हायरल
पोर्तुगालच्या पराभवामुळे ३९ वर्षीय रोनाल्डोच्या युरो स्पर्धेतील दोन दशकांच्या कारकीर्दीचा शेवट अपयशी झाला. सहाव्यांदा युरो स्पर्धेत खेळताना पोर्तुगालला दुसऱ्यांदा जेतेपद मिळवून देण्याचे रोनाल्डोचे स्वप्न होते. मात्र, ते पूर्ण होऊ शकले नाही. त्याच्या बरोबरीने युरो स्पर्धा खेळणारा सर्वांत वयस्क खेळाडू ठरलेल्या ४१ वर्षीय पेपेचीही अखेरची स्पर्धा अपयशी ठरली.
शूटआऊटमध्ये रोनाल्डोने पहिली किक यशस्वीपणे मारली असली, तरी नियोजित वेळेसह अतिरिक्त वेळेत झालेल्या पोर्तुगालच्या चुकांमध्ये त्याचाही सहभाग होता. फ्री-किक रोनाल्डो लक्ष्याच्या जवळ जाऊ शकला नाही. तसेच गोल करण्याच्या चालून आलेल्या दोन संधीही रोनाल्डोने दवडल्या. ब्रुनो फर्नांडेस, व्हिटिन्हा आणि पेपे यांनी पोर्तुगालचा किल्ला खऱ्या अर्थाने लढवला.
रोनाल्डोप्रमाणेच किलियन एम्बापेलाही प्रभाव पाडता आला नाही. फ्रान्सचा कर्णधार असलेल्या एम्बापेनेही गोल करण्याच्या संधी वाया घालवल्या. त्याच्या काही किकमध्ये जोर नसायचा, त्याच्या काही किक थेट गोलरक्षकाच्या हातात गेल्या, तर काही किक स्वैर ठरल्या. एकूणच निरस ठरलेल्या या सामन्यात रोनाल्डो आणि एम्बापे यांनाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
रोनाल्डोची ही अखेरची युरो स्पर्धा असली, तरी तो आणखी काही काळ आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळत राहण्याची शक्यता आहे. आणखी दोन वर्षांनी वयाच्या ४१ वर्षी रोनाल्डो विश्वचषक स्पर्धेत खेळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
तब्बल २६ वर्षांनी…
फ्रान्सच्या संघाला मोठ्या स्पर्धेत तब्बल २६ वर्षांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवण्यात यश आले आहे. २००६ मध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शूटआऊटमध्ये ते इटलीकडून हरले होते. त्याआधी फ्रान्सने १९९८ मध्ये विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत शूटआऊटमध्ये इटलीचाच पराभव केला होता. हा फ्रान्सचा शूटआऊटमधील अखेरचा विजय होता.
फ्रान्स पोर्तुगाल ओस्मान डेम्बेले ● (११) ख्रिास्तियानो रोनाल्डो ● युसूफ फोफाना ● (२२) बर्नार्डो सिल्वा ● जुल्स कुंडे ● (३२) जाओ फेलिक्स xब्रॅडली बार्कोला ● (४३) नुनो मेंडिस ● थिओ हर्नांडेझ ● (५३)