भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा ही विविध कारणांमुळे कायम चर्चेत असते. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतरही ती भारताचे प्रतिनिधित्व करते. या मुद्द्यावरून सानियावर अनेकदा टीका करण्यात आली, पण तिने स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करून आपली पॉवरफुल प्रतिमा जपली आहे. तिच्या अशाच पॉवरफुल रूपाचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. सानियाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात तिने एका हातात बाळ आणि दुसऱ्या हातात रॅकेट घेत आपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असल्याचा संदेश दिला आहे.

Video : गोलंदाजाने तोडला स्टंप… फलंदाजही झाला अवाक

सानिया मिर्झा सध्या दुबईत सुरू असलेल्या फेड कप टेनिस स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेत ८ मार्चला तिचा सामना इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्याशी झाला. त्या सामन्याआधी हा फोटो काढल्याचे तिने नमूद केले आहे. या फोटो मध्ये तिने एका हातात टेनिसची रॅकेट घेतली आहे, तर दुसऱ्या हातात म्हणजेच कडेवर तिने मुलगा इझान याला घेतले आहे. ‘माझं संपूर्ण आयुष्य एका फोटोत’, असे त्या फोटोला तिने कॅप्शन दिले.

#CoronaVirus : IPL 2020 राहणार टीव्हीपुरतं मर्यादित?

या फोटोत तिचा मुलगा इझान अत्यंत गोंडस दिसत आहे. त्याने जॅकेट आणि डेनिम घातली होती. त्याला कडेवर घेऊन चालत असताना तिचा पॉवरफुल फोटो क्लिक करण्यात आला.

Story img Loader