Paris Olympics 2024 PR Sreejesh Celebration After Winning Bronze: भारतीय हॉकी संघाने अखेरीस तो चमत्कार घडवला ज्याची करोडो देशवासीय आतुरतेने वाट पाहत होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने चौथे पदक जिंकले आहे. गुरुवारी भारतीय हॉकी संघाचा कांस्य पदकासाठी स्पेनशी लढत झाली. ज्यात भारताने २-१ असा शानदार विजय नोंदवला. या विजयानंतर भारतीय संघाने एकच जल्लोष केला आहे. भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेशच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा शेवटचा सामनाही होता. टीम इंडियाने त्याला गोड आणि भव्य निरोप दिला.

या विजयानंतर श्रीजेशही उत्साही दिसत होता. त्याने गोलपोस्टवर चढून विजयाचा आनंद साजरा केला. पण त्यापूर्वी सामन्याची वेळ संपल्यानंतर हरमनप्रीतने गोलपोस्टसमोर झोपून नतमस्तक होत त्याने अलविदा केलं. श्रीजेशने झोपून त्याच्या हेल्मेटला आणि गोलपोस्टचे आभार मानले त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. यानंतर श्रीजेशने त्याला मिठी मारली. श्रीजेश संपूर्ण टूर्नामेंटमध्ये खऱ्या अर्थाने एखाद्या भिंतीप्रमाणे उभा होता. या विजयासह भारतीय संघाने श्रीजेशला एक भव्य निरोप दिला. नतमस्तक झाल्यानंतर श्रीजेशला संपूर्ण भारतीय संघाने झुकून त्याच्याप्रति आदर दाखवला.

India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
Gautam Gambhir has challenged Australia ahead Border-Gavaskar Trophy
Gautam Gambhir : ‘कोणत्याही प्रकारची खेळपट्टी तयार करा, आम्ही…’, गौतम गंभीरने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला दिले आव्हान

भारताच्या विजयानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू श्रीजेशसमोर धावू लागले. त्यांनी श्रीजेशसमोर नतमस्तक होत त्याला सलामी दिली. यानंतर श्रीजेशही गोलपोस्टवर बसून आनंद साजरा करत होता. श्रीजेशच्या या विजयाच्या सेलिब्रेशनचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा कांस्यपदकासाठी भारत वि स्पेन यांच्यात हॉकी सामना खेळवला गेला. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. पण कोणताच संघ गोल करू शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनला पेनल्टी मिळाली आणि त्यांनी गोल करत आघाडी मिळवली. यानंतर ३०व्या मिनिटाला भारताला पेनल्टी मिळाली आणि यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. पण स्पेन गोल करण्यात अपयशी ठरला. यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताकडून हरमनप्रीतने पेनल्टीवर गोल केला. यासह भारताने २-१ अशी आघाडी मिळवली. चौथ्या क्वार्टरमध्ये स्पेनला दोन पेनल्टी मिळाले. पण भारताने उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला.