PR Sreejesh Head Caoch of India Junior Hockey Team: भारतीय हॉकी संघाची भिंत म्हणून ओळखला जाणारा गोलरक्षक पीआर श्रीजेश याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर गुरुवारी निवृत्ती घेतली. मात्र तरीही तो संघाशी कायम जोडलेला असणार आहे. शुक्रवारी, हॉकी इंडियाने घोषणा करत श्रीजेशच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. भारतीय संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक सामन्यात स्पेनचा २-१ च्या फरकाने पराभव करत कांस्यपदकाला गवसणी घातली. या विजयानंतर खेळाडूंनी खास अंदाजात श्रीजेशचा अखेरचा सामना आणि पदकाचं सेलिब्रेशन केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Neeraj Chopra: भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राकडून वारंवार फाऊल थ्रो का होत होता? स्पर्धेनंतर स्वत: सांगितले कारण

शुक्रवारी, हॉकी इंडियाने श्रीजेश या अनुभवी खेळाडूची ज्युनियर पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. तो आता युवा संघाला भविष्यातील आव्हानांसाठी तयार करेल. पीआर श्रीजेशचा अनुभव आणि भारतीय हॉकीमधील त्याते योगदान लक्षात घेऊन हॉकी इंडियाने त्याच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.. हॉकी इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली ज्यामध्ये त्यांनी पीआर श्रीजेशचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले की ज्युनियर पुरुष हॉकी संघाचा नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून पीआर श्रीजेश ही जबाबदारी स्वीकारेल. भविष्यातही तुम्ही सर्व तरुणांना अशीच प्रेरणा देत राहाल. आम्ही तुमच्या कोचिंग कार्यकाळाची आतुरतेने वाट पाहत आहोत.

हेही वाचा – India vs Spain: ग्लोव्हज, हेल्मेटसमोर नतमस्तक अन् मग थेट चढून गोलपोस्टवर बसून श्रीजेशने साजरा केला अखेरच्या सामन्याचा विजय, पाहा VIDEO

२००६ मध्ये पीआर श्रीजेशला भारतीय वरिष्ठ हॉकी संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. १८ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत पीआर श्रीजेशला ४ वेळा ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली ज्यामध्ये तो २ वेळा पदके जिंकण्यात यशस्वी ठरला. याशिवाय त्याने भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. हॉकीमधील योगदानाबद्दल पीआर श्रीजेशला २०२१ मध्ये भारत सरकारकडून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा – Paris Olympics 2024: “सरपंच साहब…” पंतप्रधान मोदींनी विजयानंतर हॉकी संघाला केला फोन, श्रीजेशवर सोपवली नवी जबाबदारी, पाहा VIDEO

शुक्रवारी श्रीजेशच्या निवृत्तीनंतर चाहते त्याच्या पुनरागमनाची मागणी करत होते. याविषयी तो म्हणाला, “अलविदा करण्याची हीच योग्य वेळ आहे. ऑलिम्पिकला पदक मिळवत निरोप देण्याचा ही योग्य संधी आहे, असे मला वाटते. आम्ही रिकाम्या हाताने घरी जात नाही, ही मोठी गोष्ट आहे. मला लोकांच्या भावना समजतात. मी तुमचा आदर करतो पण काही निर्णय कठीण असतात, ते योग्य वेळी घेतले तर परिस्थिती चांगली राहते, त्यामुळे माझा निर्णय बदलणार नाही. संघाने चमकदार कामगिरी करत हा सामना अविस्मरणीय बनवला आहे. टोकियोमध्ये जिंकलेल्या पदकाचे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. यामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळाला की आम्ही ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकतो.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pr sreejesh is india junior mens team new head coach announces by hockey india after his retirement in paris olympics 2024 bdg