आशियाई फुटबॉल महासंघाचे (एएफसी) उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (विफा) अध्यक्षपदी तर, साऊटर वाझ यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या या निवडणुकीत उपाध्यक्षपदाच्या पाच जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये पुण्याच्या विश्वजीत कदम, कोल्हापूरचे मालोजी राजे छत्रपती, औरंगाबादचे सय्यद हुसेन, नागपूरचे हरेश व्होरा आणि समीर मेघे यांनी बाजी मारली.

विफाची कार्यकारिणी : अध्यक्ष : प्रफुल्ल पटेल (भंडारा), उपाध्यक्ष : विश्वजीत कदम (पुणे), मालोजी राजे छत्रपती (कोल्हापूर), सय्यद हुसेन (औरंगाबाद), हरेश व्होरा आणि समीर मेघे (नागपूर), सचिव : साऊटर वाझ (मुंबई), खजिनदार : प्यारेलाल चौधरी (पुणे), सहसचिव : किरण चौगुले (सोलापूर), सलीम पर्कोटे (लातूर), सुशीलकुमार सुर्वे (अमरावती), कार्यकारी सदस्य : सुनील धांडे (बीड), दीपक दीक्षित (चंद्रपूर), अहमद ललानी (गोंदिया), अजगर हुसेन पटेल (हिंगोली), सरदार मोमिन (कोल्हापूर), खाजा रजीउद्दीन अन्सारी (नांदेड), वसंत गुलझारीलाल अग्रवाल (सांगली), रवींद्र दरेकर (गडचिरोली), गॉडविन एस. डिक (अहमदनगर), आनंद काळोकर (वर्धा), पी. व्ही. अहाले

(यवतमाळ), यू. बॅनर्जी (मुंबई), अब्दुल रॉफ(अमरावती).

 

Story img Loader