अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
‘‘सर्वप्रथम या पदासाठी सक्षम उमेदवार असल्याचे मानल्याबद्दल सर्वाचे आभार. भारतीय फुटबॉलमध्ये सकारात्मक बदल होत आहेत आणि आमचा विकास कार्यक्रम इतर देशांमध्येही चर्चिला जात असल्याचा आनंद आहे. ही भारतीय फुटबॉलसाठी कौतुकाची बाब आहे,’’ असे पटेल यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘ही मोठी जबाबदारी आहे. आता केवळ एका देशाचे प्रतिनिधित्व मी करीत नसून संपूर्ण सॅफ विभागाच्या नेतृत्वाची जबाबदारी मला पार पाडायची आहे. फुटबॉल विकासासाठी मला सर्वाचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास आहे.’’

Story img Loader