कदम चाळ, खोली क्र. ३, राम बाग रोड, कल्याण (प.).. हा तसा सामान्य पत्ता; पण १००९ धावांच्या अद्भुत विश्वविक्रमी खेळीने साऱ्यांच्या परवलीचा झाला आहे. प्रणव धनावडेचा पत्ता आता कल्याणमधील प्रत्येकाला ठाऊक आहे. संपूर्ण घरात पुष्पगुच्छ व सन्मानचिन्हांचे साम्राज्य, घराबाहेर दिव्यांची माळ आणि काही पुष्पगुच्छ लावलेली, त्यामुळे कदम चाळीत प्रणवचे घर ओळखणे आता कठीण राहिलेले नाही. एका अभूतपूर्व खेळीने प्रणवचे आयुष्य पालटून गेल्याचेच हे लक्षण. त्याचबरोबर कदम चाळीतील या खेळीचे पालटलेले रूप प्रणवने यशाकडे केलेल्या ‘कदमताला’ची कहाणीच सांगत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभिनंदनाचा वर्षांव प्रणववर अजूनही सुरूच आहे. एक ओळखीच्या काकी त्याचे अभिनंदन करायला आल्या होत्या, त्यांच्या प्रणव पाया पडला. ‘‘पाहावे तेव्हा हा घरात नेहमी अभ्यास करत बसलेला असायचा. असे काही करेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते,’’ असे त्या सहजपणे म्हणाल्या. पण प्रणव अभ्यासही तन्मयतेने करतो आणि त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत, हे यातून स्पष्ट झाले. ‘‘ही तर माझ्या कारकीर्दीची सुरुवात आहे, अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आता जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे आता पूर्वीपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागणार,’’ असे आत्मविश्वासाने सांगताना प्रणवला वास्तवाची जाणीव असल्याचे समजते.

वर्षभरापूर्वी प्रणव दादरला सरावाला जायचा. सकाळी पाच वाजता निघायचा ते ७-८ वाजता घरी यायचा. त्याचे वडील नेहमी त्याच्याबरोबर असायचे, त्यामुळे त्यांना रिक्षाचा व्यवसाय गेल्या ११ वर्षांमध्ये पूर्णपणे करता आला नाही. प्रणवबरोबर जाण्यातच त्यांचा अर्धा दिवस जायचा. त्याची आई नोकरी करायची, पण प्रणवसाठी त्यांना ती सोडावी लागली. काही तरी अर्थार्जनासाठी करणे भाग होतेच, कारण प्रणवच्या बाबांच्या एकटय़ाच्या जोरावर घर चालवणे शक्य नव्हते. परिस्थिती बेताचीच असल्याने घरातून करता येण्यासारखा त्यांनी उपाहाराचा व्यवसाय सुरू केला. ‘‘आम्ही प्रणवसाठी ज्या तडजोडी केल्या त्याचीच ही फलश्रुती आहे. आम्हाला गेल्या ११ वर्षांत कोणत्याही समारंभाला जाता आले नाही. प्रणवकडे लक्ष देण्यासाठी व्यवसायच असा निवडला की, त्याला जास्त वेळ देता येईल. घरी आल्यावर तो थोडी न्याहारी करायचा आणि शेजारी टय़ूशनला जायचा. त्यानंतर जेवून झोपायचा आणि पुन्हा सकाळी उठायचा, त्याने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे,’’ असे प्रणवच्या आईने सांगितले.

स्वत:च्या आर्थिक परिस्थितीची प्रणवला पुरती जाणीव आहे. त्यामुळे त्याने आपल्या पालकांकडे कधीच हट्ट केला नाही. बूट फाटला असेल तर तो स्वत:हून चिकटवायचा. मला हीच बॅट हवी किंवा असेच साहित्य हवे, असे त्याने कधीच पालकांना सांगितले नाही. त्याला क्रिकेट प्रशिक्षण देण्याचा निर्णय त्याच्या वडिलांचा, त्यांना क्रिकेटमध्ये रस होता. त्यामुळे चांगला क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न त्यांनी प्रणवमध्ये पाहिले. ‘‘आम्ही चाळीत राहतो. प्रणवला वाईट संगत लागू नये आणि तो तंदुरुस्त राहावा, यासाठी मी त्याला क्रिकेटच्या शिबिरामध्ये घेऊन गेलो. त्यालाही रस वाटला आणि त्याची क्रिकेटमधली कारकीर्द सुरू झाली.’’

एखादी अपूर्वाई घडल्यावर त्या व्यक्तीच्या मागे लोकांची रांग लागते. पण जेव्हा त्याचे झगडणे सुरू असते, तेव्हा मात्र त्याच्यासोबत कुणीच नव्हते. या वास्तवाची ओळख पटलेला प्रणव म्हणाला, ‘‘जेव्हा माझी काहीही ओळख नव्हती, तेव्हा काही जणांचे कुत्सित बोलणे कानी पडायचे. पण मी निराश झालो नाही. उलट मी अधिक जोमाने सराव करायचो. आता लोक माझ्या घरी येऊन अभिनंदन करतात, यावरून मी बरेच काही शिकलो आहे. आता अजून बरेच नाव कमवायचे आहे.’’

‘‘अनपेक्षितपणे लहान वयात वलय मिळाल्यावर बऱ्याच खेळाडूंची कारकीर्द खुंटलेली पाहायला मिळते. त्या वेळी त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ही फक्त सुरुवात आहे, तुला मिळालेली प्रसिद्धी, वलय सारे काही क्षणिक आहे. तू खेळाशी नेहमीच इमान राखायला हवे. आयुष्यात प्रामाणिक राहायला हवे. हे सारे इथेच विसरून जायची गरज आहे,’’ असा सल्ला प्रणवच्या आईने त्याला दिला आहे.