भारतीय बॉडी बिल्डर्स महासंघाच्या मान्यतेने मुंबई शरीरसौष्ठव आणि फिटनेस असोसिएशनने आयोजित केलेल्या ‘मुंबई-श्री’ या स्पर्धेचा निर्विवादपणे मानकरी ठरला तो गवळी फिटनेसचा प्रशांत साळुंखे. अंतिम फेरीत प्रशांतने प्रतिस्पध्र्याना लीलया धोबीपछाड देत सव्वा लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि चषक पटकावला. या स्पर्धेत सचिन बनेला उत्कृष्ट ‘पोझर’चा किताब देण्यात आला, तर वाहिद बांबूवाला याला प्रगतिकारक शरीरसौष्ठवपटूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
५५ किलो- १) रोशन तटकरे (पालकर जिम), २) शशिकांत गुडे (पालकर जिम), ३) सय्यद फरहान (पवनपुत्र जिम).
६० किलो- १) सुनील सकपाळ (पालकर जिम), २) महेंद्र पावसकर (मृत्युंजय जिम), ३) राम शिंदे (मृत्युंजय जिम).
६५ किलो- १) वाहीद बांबूवाला (गुरुदत्त जिम), २) सिद्धेश बैकर (सानिध्य जिम), ३) शिवआश्रय त्रिपाठी (पालकर जिम).
७० किलो- १) अरविंद  गौड (शिवसेना जिम), २) मोहित सालियन (पालकर जिम), ३) रोहित साखरकर (सद्गुरू मिशन फिटनेस).
७५ किलो- १) अमित रॉय (शिवप्रेरणा जिम), २) संदीप दुंदळे (शिवाई जिम), ३) सचिन वर्दे (गुरुदत्त जिम).
८० किलो- १)  अजय पेवेकर (गुरुदत्त जिम), २) विनायक वंदुरे (गुरुदत्त जिम), ३) भूषण पिसाळ (आर एम भट जिम).८० किलोवरील- १) प्रशांत साळुंखे (गवळी फिटनेस), २) रणधीर सिंग (गुरुदत्त जिम), ३) सुशांत पवार (बॉडी गॅराझ).

Story img Loader