Pratika Rawal Maiden Century INDW vs IREW: आंतरराष्ट्रीय पदार्पणातच सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या प्रतिका रावलने अखेरीस आपलं पहिलं शतक झळकावलं आहे. भारत वि आयर्लंड महिला तिसऱ्या वनडे सामन्यात भारताची नवी सलामीवीर प्रतिका रावलने ही कामगिरी केली. स्मृती मानधनासह विक्रमी भागीदारी रचल्यानंतर प्रतिका रावलने अखेरीस तिसऱ्या वनडेमध्ये आपलं शतक पूर्ण केलं आहे. प्रतिकाने रावलने १०० चेंडूत १०० धावा करत पहिलवहिल आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या अंपायरची लेक आणि सायकॉलोजीमध्ये शिक्षण घेतलेल्या प्रतिका रावलने गोलंदाजांची चांगलीच झोप उडवली. प्रतिकाने स्मृती मानधनासह सलामीला उतरताना तिच्यासह विक्रमी कमगिरी करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – Smriti Mandhana Century: स्मृती मानधनाचं वादळी शतक! वनडेमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय फलंदाज

प्रतिकाने २२ डिसेंबर २०२४ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले होते. यानंतर आयर्लंड वनडे मालिकेत तिची वादळी फलंदाजी पाहायला मिळत आहे. ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये तिने सलग दोन अर्धशतकं झळकावली आहेत. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८९ धावांची खेळी केल्यानंतर प्रतिकाने दुसऱ्या वनडेत ८३ धावा केल्या.

हेही वाचा – IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ

कोण आहे प्रतिका रावल?

प्रतिका रावल ही दिल्ली विद्यापीठातून पदवीधर आहे. तिचे वडील प्रदीप रावल हे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA) चे BCCI मान्यताप्राप्त लेव्हल-१ चे पंच आहेत. तिच्या वडिलांकडूनच प्रोत्साहन मिळाल्याने प्रतिकाने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहिले. प्रतिकाने तिने तिचा अभ्यास गांभीर्याने घेतला आणि तिच्या सीबीएसई परीक्षेत (बारावी इयत्तेची बोर्ड परीक्षा) ९२.५ टक्के गुण मिळवत मिळवले. शिक्षण आणि क्रिकेट यांच्यातील समतोल राखत प्रतिकाच्या वडिलांनी तिला रोहतक रोड जिमखाना क्रिकेट अकादमीमध्ये अनुभवी प्रशिक्षक शरवण कुमार यांच्या हाताखाली प्रशिक्षण दिले, ज्यांनी इशांत शर्मा आणि नितीश राणा यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले.

मानधना-प्रतिकाची द्विशतकी भागीदारी

स्मृती मानधनाने आयर्लंडविरुद्ध शतक झळकावल्यानंतर प्रतिका रावलनेही तिचं पहिलं शतक पूर्ण, तिने १०० चेंडूत शतक पूर्ण केले. शतकी खेळीदरम्यान तिने स्मृती मानधनासह द्विशतकी भागीदारीही केली. स्मृती मानधनाबरोबर तिने भारताच्या धावसंख्येत २३३ धावांची भर घातली, जी या दोघांमधील आतापर्यंतची सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे. प्रतिकाने आंतरराष्ट्रीय पदार्पणापासून ७ डाव खेळले आहेत. या ६ डावांपैकी ४ डावांमध्ये स्मृती आणि प्रतिकाने १०० धावांचा टप्पा गाठला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratika rawal maiden odi century in indw vs irew after continues fifties daughter of indian umpire bdg