Pratika Rawal World Record in INDW vs IREW 3rd ODI: भारताची नवी सलामीवीर प्रतिका रावलने हिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवताच आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. भारत वि आयर्लंड मालिकेत तिने एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळी केल्या पण तिला शतकापर्यंत पोहोचता आले नाही. पण प्रतिकाने अखेरच्या वनडे सामन्यात ही कसर पूर्ण केली. एकदिवसीय क्रिकेटमधलं पहिलं शतक झळकावताना तिने १५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या सामन्यातील या उत्कृष्ट खेळीशिवाय प्रतिका रावलने असा पराक्रम केला आहे, जो याआधी जगातील इतर कोणत्याही फलंदाजाला करता आला नाही. तिने ६ वनडे डावांमध्ये विक्रमी धावा केल्या आहेत.

भारत वि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने ३-० ने असा निर्भेळ विजय मिळवला आहे. सलामीवीर प्रतिका रावलने राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात १५४ धावा केल्या. यासह भारतीय महिला क्रिकेट संघाने वनडेत प्रथमच ४०० धावांचा टप्पा पार केला. याआधी याच सामन्यात कर्णधार स्मृती मानधनानेही शतक झळकावले होते. एकीकडे स्मृती मानधनाचे हे दहावे शतक होते, तर दुसरीकडे प्रतिकाने वनडेतील पहिले शतक झळकावले.

IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Arshdeep Singh clean bowled to Ruturaj Gaikwad during MAH vs PUN match in Vijay Hazare Trophy 2025
Vijay Hazare Trophy : अर्शदीपचा अफलातून स्पेल! ऋतुराजचा त्रिफळा उडवत महाराष्ट्राच्या टॉप ऑर्डरला पाडली खिंडार, VIDEO व्हायरल
Sunil Gavaskar upset that he was Not called to hand over Border Gavaskar Trophy to Australia IND vs AUS
IND vs AUS: सुनील गावस्करांचा ऑस्ट्रेलियात अपमान? नाराजी व्यक्त करत म्हणाले, “मी भारतीय आहे म्हणून…”
Pat Cummins becomes first bowler toTake record 200 WTC wickets in History IND vs AUS Sydney
IND vs AUS: पॅट कमिन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड, WTC च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज
Yashasvi Jaiswal First Indian Batter To Score 16 Runs in 1st Over of the innings IND vs AUS
IND vs AUS: यशस्वी जैस्वालने सिडनी कसोटीत रचला नवा विक्रम, भारताच्या कसोटी इतिहासात कोणालाही जमला नाही असा पराक्रम
Rishabh Pant Fastest Fifty by a visiting batter on Australian soil in Just 29 Balls IND vs AUS Sydney test
IND vs AUS: ऋषभ पंतने वादळी अर्धशतकासह घडवला इतिहास, ऑस्ट्रेलियात ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
Jasprit Bumrah breaks Bishan Singh Bedi's record during IND vs AUS Sydney Test
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने घडवला इतिहास! ऑस्ट्रेलियात ‘हा’ मोठा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज

हेही वाचा – INDW vs IREW: टीम इंडियाची युवा सलामीवीर प्रतिका रावलचं पहिलं वनडे शतक, भारतीय अंपायरच्या लेकीची धमाकेदार खेळी

प्रतिका रावलला आयर्लंड मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. प्रतिका आता भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक खेळी खेळणारी तिसरी फलंदाज ठरली आहे. दीप्ती शर्माने भारतीय महिला संघासाठी सर्वात मोठी एकदिवसीय खेळी खेळली आहे. तिने २०१७ मध्ये आयर्लंडविरुद्ध १८८ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१७ मध्येच हरमनप्रीत कौरने नाबाद ११ धावांची शानदार खेळी केली होती. आता प्रतिका रावलने १५४ धावा करत तिसरे स्थान मिळवले आहे.

हेही वाचा – India Women Highest ODI Total: भारतीय महिला संघाची वनडेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या, पुरूष संघालाही टाकलं मागे

प्रतिका रावलने अवघ्या सहा वनडे सामन्यांमध्ये विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. तिने पहिल्या ६ एकदिवसीय डावात एकूण ४४४ धावा केल्या आहेत. पहिल्या सहा वनडे सामन्यांनंतर कोणत्याही महिला फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. तिने थायलंडच्या नत्थाकन चँथमला मागे टाकले आहे, ज्याने तिच्या पहिल्या सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये ३२२ धावा केल्या होत्या. प्रतिकाने वेस्ट इंडिजविरूद्धच्या वनडे मालिकेत भारताकडून पदार्पण केले होते.

Story img Loader