Longest Six In IPL History : आयपीएलचा १६ व्या सीजनचा थरार ३१ मार्च २०२३ पासून सुरु होणार असून गुजरात टायटन्स आणि सीएसके यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडू मैदानात चौकार षटकारांचा पाऊस पाडत क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. या लीगमध्ये एकाहून एक रंगतदार सामने पाहायला मिळतात. तत्पुर्वी, आम्ही तुम्हाला आयपीएलच्या तीन सर्वात लांब षटकारांबद्दल माहिती देणार आहोत. ज्यामध्ये एक मोठा षटकार भारताच्या गोलंदाजानेही ठोकला होता.
आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या टॉप- ३ लिस्टमध्ये दोन विदेशी खेळाडू आहेत. तिसऱ्या नंबरवर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर एडम गिलक्रिस्ट आहे. त्याने वर्ष २०११ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी १२२ मीटरचा षटकार ठोकला होता. गिलक्रिस्टने त्याच्या देशासाठी मोठं योगदान दिलं आहे. तसंच आयपीएलमध्ये त्याने ८० सामने खेळले आहेत. गिलक्रिस्टच्या आयपीएल विक्रमाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आयपीएलच्या ८० सामन्यांत २०६९ धावा केल्या आहेत. तसंच त्याने ९२ षटकारही ठोकले आहेत.
२०१३ च्या आयपीएल सीजनमध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारने केलेला पराक्रम पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आयपीएलच्या सहाव्या सीजनमध्ये सर्वात लांब षटकार ठोकणारा प्रवीण कुमार भारताचा पहिला खेळाडू आहे. प्रवीणने श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीवर १२४ मीटर लांब षटकार ठोकला होता.
रोहित शर्मा आणि ख्रिस गेलसारखे फलंदाज आयपीएलमध्ये षटकार ठोकण्यात माहीर आहेत. पण प्रवीण कुमारचा हा विक्रम आतापर्यंत कोणत्याच खेळाडूने मोडला नाहीय. या लिस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू एल्बी मॉर्केल अव्वल स्थानावर आहे. त्याने आयपीएलमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने ९१ सामन्यांमध्ये ६८ इनिंग खेळल्या असून ९७४ धावा केल्या आहेत. मॉर्केलने आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार ठोकला आहे. सीएसकेच्या विरोधात झालेल्या सामन्यात आयपीएलच्या पहिल्याच सीजनमध्ये मॉर्केलने १२५ मीटर लांब षटकार ठोकला होता.