घरच्या मैदानावर दणकेबाज फलंदाजी आणि मुंबईचा ४२ वर्षीय प्रवीण तांबेच्या (१५ धावांत ४ बळी) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने लायन्स संघावर ३० धावांची विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने लायन्सपुढे १८४ धावांचे आव्हान ठेवले होते, पण लायन्सला राजस्थानच्या भेदक माऱ्यापुढे १५३ धावा करता आल्या. सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थानने सलग दहाव्या विजयाची नोंद केली.
लायन्सने नाणेफेक जिंकत राजस्थानला फलंदाजीला पाचारण केले. राजस्थानच्या स्टुअर्ट बिन्नी याने २० चेंडूंत ५ चौकार व एका षटकाराच्या जोरावर ३८ आणि ब्रॅड हॉजने २३ चेंडमूंत ६ चौकार व २ षटकारांच्या जोरावर नाबाद ४६ धावा फटकावल्यामुळे राजस्थानला ५ बाद १८४ अशी मजल मारता आली.
या आव्हानाचा पाठलाग करताला लायन्सची सुरुवात चांगली झाली नसली तरी कर्णधार अल्विरो पीटरसनने २८ चेंडूंत ४ चौकारांच्या जोरावर ४० धावांची खेळी करत संघाचे आव्हान जिवंत ठेवले होते. पण तांबेने त्याच्यासह अन्य तीन फलंदाजांना बाद करत राजस्थानला विजयपथावर पोहोचवले व सामनावीर पुरस्कार पटकावला
ब्रूमच्या झंझावती शतकासह ओटॅगोचा मोठा विजय
जयपूर : सलामीवीर नील ब्रूम याने ५६ चेंडूंमध्ये केलेल्या ११७ धावांमुळेच ओटॅगो व्होल्ट्स संघाने पर्थ स्कॉर्चर्सविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत ६२ धावांनी विजय मिळविला. रयान टेन डोईश्चॅट याने २६ चेंडूंत ६६ धावा करीत ब्रुमच्या साथीत आठ षटकांमध्ये १२६ धावांची भागीदारी केली. ओटॅगो संघाने २० षटकांत ४ बाद २४२ धावा करीत या स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या उभारली. पर्थने या धावसंख्येस उत्तर देताना २० षटकांत ६ बाद १८० धावा केल्या. त्यामध्ये हिल्टॉन कार्टराईटने नाबाद ७३ धावा केल्या, तर अ‍ॅडम व्होग्जने ३६ धावा केल्या.

Story img Loader