Preethi Pal Creates History with 2nd Medal in Paris Paralympics 2024: भारताची युवा ॲथलीट प्रीती पाल हिने रविवारी इतिहास घडवला. प्रीतीने पॅरालिम्पिक स्पर्धेत २०० मीटरच्या T35 प्रकारात देशासाठी कांस्यपदक जिंकले. पॅरिस पॅरालिम्पिकमधील प्रितीचे हे दुसरे पदक आहे. यापूर्वी तिने २०० मीटरमध्येही कांस्यपदक जिंकले होते. प्रितीने ३०.०१ सेकंदाची वेळ नोंदवत आपली सर्वोत्तम कामगिरी केली. यासह भारताच्या पदकांची संख्या आता सात झाली आहे. याआधी भारताने नेमबाजीत चार तर ॲथलेटिक्समध्ये दोन पदकं जिंकले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॅरालिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्डमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. २०० मी. शर्यतीतील सुवर्ण आणि रौप्य पदकं चीनच्या खेळाडूंनी जिंकली. चीनच्या जिया झाऊने २८.१५ सेकंद वेळेसह सुवर्ण आणि झोउ कियानक्वानने २९.०९ सेकंद वेळेसह रौप्यपदक जिंकले. आहे. हायपरटोनिया, ऍटॅक्सिया आणि ऍथेटोसिस सारख्या समन्वय विकारांनी ग्रस्त असलेले खेळाडू T35 श्रेणीत भाग घेतात.

हेही वाचा – Paris Paralympics 2024: निषाद कुमारची रौप्यपदकाला गवसणी, भारतीय सैन्यात भरती होत देशाची सेवा करण्याचं होतं स्वप्न, एका अपघातामुळे राहिलं अपुरं

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रिती पाल हिचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले, ‘प्रीती पाल यांनी इतिहास घडवला. २०२४ च्या पॅरालिम्पिकमध्ये तिने दुसरे पदक जिंकले. २०० मीटर T35 स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले. त्या भारतातील लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत.

हेही वाचा – Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे टीम इंडियात पुनरागमन करण्यास सज्ज! काउंटी चॅम्पियनशिपमध्ये शतक झळकावत दिले संकेत

पाचव्या दिवशी पदकांची संख्या वाढण्याची खात्री

पॅरिस पॅरालिम्पिकचा पाचवा दिवस भारतासाठी खूप खास असणार आहे, ज्यामध्ये पदकांची संख्या आणखी वाढणार आहे. बॅडमिंटनमध्ये सुहास यथीराज आणि नितीश कुमार वेगवेगळ्या प्रकारात पुरुष एकेरीत सुवर्णपदकाचा सामना खेळतील. याशिवाय भालाफेकीत सुमित अंतिल अंतिम फेरीत ॲक्शन मध्ये दिसणार आहे. तिरंदाजीमध्ये, शीतल देवी आणि राकेश कुमार मिश्र कंपाउंड स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरीतील सामना खेळतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preethi pal creates history with won 2nd bronze medal in in 200m t35 racing paris paralympics 2024 bdg