ब्राझिलच्या अध्यक्षा दिल्मा रूसेफ यांचे आवाहन
नवजात बालकांमध्ये शारीरिक व्यंग निर्माण करणाऱ्या ‘झिका’ विषाणूमुळे गर्भवती खेळाडूंनी ब्राझिलमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पध्रेत येणे टाळावे, असे आवाहन ब्राझिलच्या अध्यक्षा दिल्मा रूसेफ यांनी केले आहे.
‘‘गर्भवती महिलांसाठी हा गंभीर धोका आहे. त्यामुळे हा धोका पत्करायचा नसल्यास तुम्ही येथे येण्याचे टाळा,’’ असे कॅबिनेट मंत्री जॅक्स वँगर यांनी सांगितले. डासांमुळे निर्माण होणाऱ्या या विषाणूची तपासणी केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) आणीबाणी जाहीर केली. या पाश्र्वभूमीवर सहा महिन्यांनंतर होणाऱ्या ऑलिम्पिक स्पध्रेपूर्वी हे आवाहन करण्यात आले आहे. ‘‘डब्लूएचओने उचललेले पाऊल सकारात्मक असून विज्ञान विश्वासह संपूर्ण जगासाठी हा धोक्याचा इशारा आहे,’’ असे वँगर म्हणाले.

Story img Loader