Saint Lucia Kings Won CPL 2024 Trophy : अभिनेत्री प्रीती झिंटा आयपीएलमधील पंजाब किंग्जची सहमालक आहे. तिच्या संघाला अद्याप एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. सर्व १७ हंगाम खेळूनही संघ केवळ एकदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. मात्र, आयपीएलमध्ये सातत्याने अपयश येत असताना प्रीती झिंटासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. तिच्या मालकीच्या सेंट लुसिया किंग्ज संघाने कॅरिबियन प्रीमियर लीग म्हणजेच सीपीएल २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. या संघाने अंतिम फेरीत गयाना ॲमेझॉन वॉरियर्सचा ६ गडी राखून पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅरिबियन प्रीमियर लीग २०२४ चा अंतिम सामना रविवारी ६ ऑक्टोबर रोजी गयाना ॲमेझॉन वॉरियर्स आणि सेंट लुसिया किंग्ज यांच्यात गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळला गेला. सेंट लुसिया किंग्सने हा विजेतेपदाचा सामना जिंकला आणि संघ प्रथमच सीपीएलचा चॅम्पियन ठरला. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील सेंट लुसिया किंग्जने इम्रान ताहिरच्या नेतृत्वाखालील गयाना संघाचा ६ गडी राखून पराभव केला. यावेळी ४५ वर्षीय कर्णधार इम्रान ताहिरची जादू चालली नाही, ज्याने २०२३ चे विजेतेपद जिंकून इतिहास लिहिला होता. कारण तो टी-२० लीग जिंकणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला होता.

सेंट लुसिया किंग्ज संघाने पटकावले पहिले जेतेपद –

या सामन्याबद्दल बोलायचे तर सेंट लुसियाचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून गयाना ॲमेझॉन वॉरियर्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. गयाना संघाने २० षटकात ८ गडी गमावून १३८ धावा केल्या होत्या. संघातील जवळपास प्रत्येक खेळाडूला चांगली सुरुवात मिळाली होती, पण कोणीही मोठी खेळी करू शकले नाही. रहमानुल्ला गुरबाज (०) वगळता, इतर खेळाडूंनी किमान दुहेरी आकडा नक्कीच पार केला. मात्र, सर्वाधिक धावा करणाऱ्या ड्वान प्रिटोरियसने (२५) केल्या. शाई होपने २२ धावा आल्या. सेंट लुसियाकडून नूर अहमदने ३ विकेट्स घेतल्या, तर संघाच्या उर्वरित पाच खेळाडूंना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा – Mohammed Siraj : ‘माझी इंग्रजी संपली…’, अक्षर पटेलने सांगितला सिराजच्या मुलाखतीचा मजेशीर किस्सा, पाहा VIDEO

इम्रान ताहिरचा संघ ठरला उपविजेता –

सेंट लुसिया संघ १३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा संघाला चांगली सुरुवात मिळाली. मात्र, नंतर ५१ धावांपर्यंत चार विकेट्स पडल्या, पण ॲरॉन जोन्स आणि रोस्टन चेस यांनी ८८ धावांची नाबाद भागीदारी करून सामना १९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जिंकून दिला. ॲरॉन जोन्स ४८ आणि रोस्टन चेस ३९ धावा करून नाबाद माघारी परतले. कर्णधार डु प्लेसिसने २१ धावांची खेळी केली. गयानच्या चार गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. फायनलमध्ये इम्रान ताहिरने शानदार गोलंदाजी केली, परंतु तो यावेळी संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preity zintas saint lucia kings beat guyana amazon warriors and won cpl 2024 trophy vbm