आयपीएलच्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात अडकलेला वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत याच्याबद्दल आता बोलणे उचित ठरणार नाही, असे केरळ क्रिकेट असोसिएशनने (केसीए) स्पष्ट केले आहे.श्रीशांत दोषी आहे की निर्दोष हे आता बोलणे उचित ठरणार नाही. दिल्ली पोलीस आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या प्रकरणाची चौकशी करत आहेत, त्यामुळे या प्रकरणावर बोलण्यासाठी थोडे थांबावे लागेल, असे केसीएचे सचिव टी. सी. मॅथ्यूज यांनी म्हटले आहे.

Story img Loader