मँचेस्टर : अमाद डिआलोने (९०व्या मिनिटाला) झळकावलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये मँचेस्टर सिटी संघावर २-१ असा विजय मिळवला. सिटीचा गेल्या ११ सामन्यांतील हा आठवा पराभव आहे. या विजयामुळे युनायटेडचा संघ २२ गुणांसह १३व्या स्थानी आहे. तर, सिटीचा संघ (२७ गुण) गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चांगली चुरस पहायला मिळाली. सामन्याच्या ३६व्या मिनिटाला जोस्को ग्वार्डिओलने गोल झळकावत सिटीला आघाडी मिळवून दिली. संघाची ही आघाडी सामन्याच्या ८८व्या मिनिटांपर्यंत कायमही होती. यानंतर युनायटेडकडून ब्रुनो फर्नांडेसने पेनल्टीच्या साहाय्याने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. मग, डिआलोने बचावफळीता भेदत युनायटेडला २-१ असे आघाडीवर पोहोचवले. यानंतर सिटीकडून बरोबरी साधण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण, तोपर्यंत उशीर झाला होता.

हेही वाचा >>>Jasprit Bumrah: “गुगल करून रेकॉर्ड बघ…”, बुमराहने आपल्या फलंदाजी कौशल्यावर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला दिलं सडेतोड उत्तर; नेमकं काय घडलं?

गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या चेल्सीने ब्रेंटफोर्डला २-१ अशा फरकाने नमवले. या विजयामुळे चेल्सी व लिव्हरपूल यांच्यात आता केवळ दोन गुणांचा फरक आहे. लीव्हरपूल संघाचे ३६ गुण असून ते गुणतालिकेत शीर्ष स्थानी आहेत. तर, चेल्सी तिसऱ्या स्थानी असणाऱ्या आर्सेनल संघाच्या चार गुणांची पुढे आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premier league football manchester united win against manchester city sports news amy