भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याचे काळे ढग आता दाटून आले आहेत. क्रिकेट या खेळाची विश्वासार्हता टिकवण्यासाठी श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा आणि आसाम क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांनी केली आहे.
‘‘स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेट या खेळाला काळीमा फासला गेला आहे. त्याचबरोबर या खेळावर प्रेम करणाऱ्या कोटय़वधी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर लोकांचा या खेळावर पुन्हा विश्वास बसेल, अशी आशा आहे,’’ असे कंपनी व्यवहार मंत्री सचिन पायलट यांनी सांगितले.
‘‘श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यायला हवा. अन्य पर्याय येथे नाही. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग असलेला श्रीनिवासन यांचा जावई जर यात सामील असेल तर, त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय ही चौकशी पारपदर्शीपणे होऊ शकणार नाही,’’ असे मत गोवा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष शेखर सलकार यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, ‘‘बीसीसीआयची प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांनी राजीनामा द्यायला हवा. जर त्यांनी खरेच काही चुकीचे केले नसेल तर ते पुन्हा बीसीसीआयचे अध्यक्ष होऊ शकतील. परंतु चौकशी संपेपर्यंत तरी त्यांनी पदाचा त्याग करावा.’’
आसाम क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम रॉय यांनी सांगितले की, ‘‘निष्पक्षपातीपणा जपण्यासाठी चौकशी सुरू असेपर्यंत श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदापासून दूर राहावे, असे माझे वैयक्तिक मत आहे.’’
राजीनाम्यासाठी श्रीनिवासन यांच्यावर वाढता दबाव
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याचे काळे ढग आता दाटून आले आहेत. क्रिकेट या खेळाची विश्वासार्हता टिकवण्यासाठी श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा आणि आसाम क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-05-2013 at 04:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pressure mounts on srinivasan to resign