IND vs PAK, World Cup 2023: विश्वचषक २०२३ मध्ये भारताची विजयी मोहीम सुरूच आहे. आपल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा आठ विकेट्सने पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ गडी गमावून २७२ धावा केल्या. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने ८० धावांची तर अजमतुल्ला उमरझाईने ६२ धावांची खेळी खेळली. आता याचदरम्यान शुबमन गिलबाबत एक चांगली बातमी समोर येत आहे. अफगाणिस्तान सामन्यानंतर इशान किशनने सूचक विधान केले आहे.

इशान किशनने शुबमन गिलबाबत मोठे अपडेट

इशान किशनने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना शुबमन गिलच्या तब्येतीबाबत मोठे अपडेट दिले. तो म्हणाला, “सध्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. प्लेटलेट कमी झाल्यामुळे त्याला नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता तो लवकरच पाकिस्तानविरुद्धच्या पुनरागमन करू शकतो. तो खूप फिटनेसकडे लक्ष देणारा असल्याने त्याची तब्येत झपाट्याने सुधारत आहे. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, राहुल द्रविड आमचे कोच आणि रोहितभाई त्याच्या संपर्कात आहोत. शुबमन बरा होत असून पुढच्या सामन्यात खेळणार का नाही यावर संघ व्यवस्थापन विचार करत आहे.”

Yuvraj Singh Message to Abhishek Sharma After Historic Century Reveals His Father
Yuvraj Singh Abhishek Sharma: “हे विसरू नकोस की तुला…” अभिषेक शर्माला शतकानंतरही युवराज सिंगने दिल्या सूचना, अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं काय होता मेसेज
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
syria interim president ahmed al sharaa first visit to saudi
सीरियाच्या हंगामी अध्यक्षांची पहिली भेट सौदी अरेबियाला… इराणपासून फारकत घेत असल्याचे संकेत?
Satyendra Das
राम मंदिराचे मुख्य पूजारी सत्येंद्र दास यांची प्रकृती चिंताजनक; ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Gashmeer Mahajani on Chhaava Controversy
Video: एकाच चित्रपटात दुहेरी ऐतिहासिक भूमिका करणारा गश्मीर महाजनी ‘छावा’च्या वादाबद्दल म्हणाला, “माझा अनुभव…”
बीड राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या इशाऱ्यानंतर ‘साफसफाई’ होणार का ?
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”

हेही वाचा: IND vs AFG: …अखेर घोडं गंगेत न्हालं! कोहली-नवीनची दिलजमाई, कॉमेंट्रीला गंभीरची उपस्थिती; पाहा Video

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गिल अहमदाबादमध्ये भारतीय संघात सामील होणार आहे. अशा परिस्थितीत तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. पण गिलसमोर मोठे आव्हान असेल ते मॅच फिट होण्याचे. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता कायम आहे.

शुबमन पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार?

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “शुबमन गिलला तंदुरुस्त होण्यासाठी आणि मॅच फिटनेस परत मिळवण्यासाठी पूर्ण वेळ दिला जाईल. यावेळी त्याच्याजागी बदली खेळाडू शोधण्याचा किंवा चर्चा करण्याचा कोणताही विचार नाही कारण व्यवस्थापन त्याला संघातील एक महत्त्वाचा सदस्य मानत आहे. शुबमनच्या तब्येतीत सुधारणा हो असल्याने लवकरच तो पुनरागमन करेल.”

हेही वाचा: IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी अमिताभ-रजनीकांत अन् सचिन राहणार उपस्थित; अहमदाबादमध्ये रंगणार रंगारंग सोहळा

टीम इंडियाचे सलामीवीर म्हणाला, “शुबमन आजारातून बरा होत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो हॉटेलमध्ये परतला आहे. तो वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली आहे. तो लवकरच बरा होऊन संघात सामील होईल. संघाबरोबर तो अहमदाबाद रवाना देखील होणार आहे.” भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Story img Loader