Prithvi Shaw Scored Another Hundred: भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ सध्या फॉर्ममध्ये येण्यासाठी रॉयल लंडन वन डे चषक स्पर्धेत नॉर्थम्प्टनशायर संघाकडून खेळत आहे. शॉने आतापर्यंत या स्पर्धेत वादळी खेळी करत आगामी विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघात आपली दावेदारी ठोकली आहे. पदार्पणानंतर दुसऱ्या सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या शॉने तिसऱ्या सामन्यातही शानदार झंझावाती शतकी खेळी खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या खेळीकडे आता बीसीसीआय निवड समिती काय म्हणते? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रॉयल लंडन वन डे चषकात पृथ्वी शॉची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या सामन्यात बाउन्सर चेंडूवर तोल गमावल्याने तो हिट-विकेट आऊट झाला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात शॉने शानदार पुनरागमन करत २४४ धावांची विक्रमी द्विशतकी खेळी खेळली. आता त्याच फॉर्ममध्ये सातत्य राखत त्याने डरहमविरुद्धच्या सामन्यात नाबाद १२५ धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

डरहॅमविरुद्धच्या सामन्यात नॉर्थम्प्टनशायरच्या संघाला १९० धावांचे लक्ष्य मिळाले होते. पृथ्वी शॉने सुरुवातीपासूनच एक बाजू सांभाळून धरत डावाला आकार दिला आणि संघाला विजयाकडे नेण्याचे काम केले. या सामन्यात शॉने अवघ्या ६८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. त्याच्या या १२५ धावांच्या नाबाद तुफानी खेळीत १५ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. नॉर्थहॅम्प्टनशायर संघाने २५.४ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले.

हेही वाचा: IND vs WI: वेस्ट इंडीजमध्ये भारतीय संघाची झाली नाचक्की, जे १७ वर्षात घडलं नाही ते हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीखाली…

पृथ्वीने टीम इंडियाकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२१ मध्ये खेळला गेला होता

पृथ्वी शॉसाठी गेली काही वर्षे कामगिरीच्या दृष्टिकोनातून अजिबात चांगली ठरली नाहीत. जुलै २०२१मध्ये त्याला अखेरची भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर आजतागायत त्याला आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याचवेळी, आयपीएलच्या १६व्या हंगामातही शॉ काही खास चमकदार खेळी करू शकला नाही. अशा परिस्थितीत त्याने पुन्हा टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी इंग्लंडच्या देशांतर्गत वन डे स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यात त्याला आतापर्यंतच्या सामन्यात चांगले यश येत आहे. त्यामुळे आगामी विश्वचषक २०२३साठी जर के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर हे उपलब्ध नसतील तर पृथ्वीचा विचार नक्कीच केला जाऊ शकतो. संजू सॅमसनचा खराब फॉर्म पाहता त्याच्याआधी निवड समिती पृथ्वी शॉला आजमावून पाहण्याचा विचार करू शकते.