भारतीय क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ अलीकडेच एकत्र प्रशिक्षण घेताना दिसून आले. टीम इंडिया, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबईसाठी एकत्र खेळलेले दोन्ही खेळाडू एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अलीकडेच पुढे ढकलण्यात आलेल्या आयपीएल २०२१मध्ये पृथ्वी शॉ चांगल्याच फॉ़र्मात होता. तर खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर हंगामाच्या पहिल्या टप्प्यात खेळू शकला नाही.

आयपीएल २०२१चे उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहेत. शॉ आणि अय्यर दोघेही या स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्स संघात सहभागी होतील. मात्र, याआधी मर्यादित षटकांच्या मालिकेत भारतीय संघाला श्रीलंकेत जावे लागणार आहे. या दौऱ्यासाठी शॉ आणि अय्यर मैदानात सराव करत आहेत.

हेही वाचा – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित झालेल्या खेळाडूसाठी चक्क पंतप्रधानांचा पुढाकार!

आयपीएल २०२१पूर्वी भारतीय संघ तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा करेल. श्रेयस अय्यर श्रीलंकेच्या दौऱ्यावर पुनरागमनासाठी उत्सुक असेल. जर तो पूर्णपणे तंदुरुस्त असेल, तर कदाचित टीम इंडियाचे कर्णधारपद त्याला मिळू शकते. प्रथमच दोन भारतीय संघ वेगवेगळ्या देशांमध्ये एकाच वेळी खेळतील. वरिष्ठ संघाचे अनेक खेळाडू कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला गेले आहेत.

Story img Loader