Prithvi Shaw Birthday Party Dance Video Viral: भारतीय संघाबाहेर असलेला फलंदाज पृथ्वी शॉचा ९ नोव्हेंबरला वाढदिवस होता. पृथ्वी शॉ आथा २५ वर्षांचा झाला आहे. हा दिवस त्याच्यासाठी आणखी खास बनला, कारण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबईच्या २८ संभाव्य खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे. ही ट्रॉफी २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पृथ्वी शॉने त्याच्या २५ व्या वाढदिवशी इन्स्टाग्राम स्टोरीवर मित्रांबरोबर सेलिब्रेशन करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हीडिओमध्ये पृथ्वी शॉ तांबडी चामडी गाण्यावर त्याच्या मित्रांबरोबर नाचत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. फिटनेस आणि शिस्तभंगामुळे चर्चेत असलेल्या पृथ्वीचा हा व्हीडिओ पाहून चाहते त्याला ट्रोल करत आहेत. पृथ्वी सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. यामुळेच तो भारतीय संघात आपले स्थान पक्के करू शकला नाही.

हेही वाचा – IND vs SA: “आता उभा राहून मजा बघ…”, हार्दिक पंड्याला मोठेपणा करणं पडलं भारी, अर्शदीपला बोललेल्या वाक्यानंतर होतोय ट्रोल

फिटनेस आणि शिस्तभंग केल्यामुळे मुंबईच्या रणजी संघातून पृथ्वीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. फिटनेस आणि शिस्तभंगाच्या मुद्द्यांमुळे त्रिपुराविरुद्धच्या रणजी सामन्यासाठी मुंबईच्या संघातून वगळण्यात आले होते. पृथ्वी मुंबईच्या सराव सत्रांना नियमितपणे उपस्थित राहत नव्हता आणि त्याचे वजनही थोडे जास्त असल्याचे दिसून आले, ज्यामुळे निवडकर्त्यांनी इतर पर्यायांचा विचार केला. यानंतर शॉचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या युवा फलंदाजाच्या टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमनाच्या आशा निर्माण झाल्या आहेत. मात्र, शॉची क्रिकेट कारकीर्द मैदानाबाहेरील वादांमुळे चर्चेत राहिली आहे.

हेही वाचा – IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?

पृथ्वी शॉच्या या व्हीडिओमध्ये तो त्याच्या मित्र मैत्रिणींबरोबर वाढदिवसाचा आनंद साजरा करत आहे. या व्हीडिओमध्ये त्याची रूमर्ड गर्लफ्रेंड निधी तापडियादेखील आहे. २५ वर्षीय शॉ, ज्याने सहा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून भारतासाठी पाच कसोटी, सहा एकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळला आहे. त्याने कसोटीत ३३९ धावा, एकदिवसीय सामन्यात १८९ धावा आहेत आणि टी-०२० मध्ये त्याला आतापर्यंत एकही धाव करता आलेली नाही. याशिवाय शॉ २०१८ पासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. मात्र, मेगा लिलावापूर्वी त्याला रिलीज करण्यात आले आहे. शॉने आयपीएलमध्ये ७९ सामन्यांमध्ये १८९२ धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithvi shaw dance video viral of his 25th birthday party trolled for disciplinary issues in ranji trophy bdg