भारतीय क्रिकेट संघातून बाजूला झालेला फलंदाज पृथ्वी शॉ सध्या रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. आसामविरुद्धच्या सामन्यात पृथ्वीने ३७९ धावांची खेळी केली, ज्याची चौफेर चर्चा होत आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही पृथ्वीच्या खेळीचे कौतुक केले आहे. कसोटी पदार्पणात शतक झळकावणाऱ्या पृथ्वीला आतापर्यंत टीम इंडियात आपले स्थान पक्के करण्यात अपयश आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पृथ्वी शॉ प्रसिद्धीच्या झोतात आहे. पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध ९८.९६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ३८३ चेंडूत ३७९ धावा केल्या होत्या. या खेळीदरम्यान पृथ्वीने ४९ चौकार आणि ४ षटकार मारले. या कामगिरीच्या जोरावर पृथ्वी शॉने टीम इंडियात प्रवेशाचे दार ठोठावले आहे. मात्र, पृथ्वी शॉने ४०० हून अधिक धावा केल्या असत्या तर ते आपल्यासाठी चांगले झाले असते, असे भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांना वाटते.

हेही वाचा: Indian Cricketer Death: धक्कादायक! ओडिशाच्या जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला महिला क्रिकेटरचा मृतदेह, कुटुंबीयांचा खूनाचा आरोप

सुनील गावसकर यांनी पृथ्वी शॉ चे कौतुक केले

लिटिल मास्टर म्हणून प्रसिद्ध सुनील गावसकर यांनी भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील कॉमेंट्रीदरम्यान पृथ्वीने रणजीमध्ये खेळलेल्या विक्रमी खेळीचा संदर्भ देत त्याला अशा खेळीची गरज असल्याचे सांगितले. गावसकर म्हणाले, “प्रत्येकजण ६० किंवा ७० धावा करतो. निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी तुम्हाला मोठी धावसंख्या उभारावी लागते. तो प्रेमाने धावा काढत होता. खरं तर, निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी तुम्हाला मोठी शतके, दुहेरी किंवा तिहेरी शतके झळकावी लागतात. त्याने जवळपास ४०० धावांची इनिंग खेळली. त्याने ४०० हून अधिक धावांची इनिंग खेळली असती तर अधिक आनंद झाला असता पण एक मुंबईकर म्हणून मला त्याचा अभिमान आहे.”

महाराष्ट्राच्या भाऊसाहेब निंबाळकर यांनी डिसेंबर १९४८ मध्ये काठियावाडविरुद्ध नाबाद ४४३ धावांची खेळी केली होती. यानंतर शॉच्या खेळीचा क्रमांक लागतो. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पृथ्वी शॉ म्हणाला, ‘मी जास्त विचार करत नव्हतो की मला रेकॉर्ड बनवायचे आहे. २४० धावा करून परत आलो तेव्हा मी त्या धावा जमिनीवर सोडल्या. मला फक्त शून्यातून नवीन सुरुवात करायची होती. मी रिकामा होतो आणि चेंडूच्या गुणवत्तेनुसार खेळत होतो.

हेही वाचा: IND vs AUS: टीम इंडियाला मिळाली ऋषभ पंतची रिप्लेसमेंट! म्हणाला, “मी डाव सुरू करण्यास तयार आहे…”

पृथ्वी शॉ पुढे म्हणाला, “मला माहित नव्हते की हा एक विक्रम आहे, मला ड्रेसिंग रूमच्या आत सांगण्यात आले की मी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या केली आहे.” पृथ्वी शॉने भारतासाठी ५ कसोटी सामन्यात ४२.३८ च्या सरासरीने आणि ८६.०४ च्या स्ट्राईक रेटने ३३९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर पृथ्वी शॉने ६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १८९ धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉने भारतासाठी एक टी२० सामनाही खेळला आहे ज्यात तो ० धावांवर बाद झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithvi shaw everyone makes 60 or 70 runs if prithvi shaw had scored 400 runs then why did sunil gavaskar say this avw