Prithvi Shaw has been ruled out of the county cricket: भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडच्या डोमेस्टिक टूर्नामेंट वन डे कप 2023 मध्ये खेळत आहे. तो नॉर्थम्प्टनशायरचा खेळाडू आहे. पण पृथ्वी दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अनेक अडचणींनंतर तो फॉर्ममध्ये परतला होता. मात्र, आता दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. पृथ्वीने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. द्विशतक झळकावल्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला.

टीम इंडियाचा सलामीवीर पृथ्वी शॉला रविवारी डरहमविरुद्धच्या वनडेमध्ये क्षेत्ररक्षण करताना गुडघ्याला दुखापत झाली. तो यापुढे काउंटीमध्ये नॉर्थहॅम्प्टनशायरकडून खेळणार नाही. कौंटी संघाने जारी केलेल्या निवेदनानुसार, स्कॅनच्या निकालांवरून दुखापत अपेक्षेपेक्षा जास्त गंभीर असल्याचे दिसून आले आहे. शॉ सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या संपर्कात असून शुक्रवारी तो लंडनमध्ये एका तज्ज्ञाला भेटणार आहे.

Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Sam Curran England Cricketer Brother Ben Curran Will Play for Zimbabwe Cricket Team
सॅम करनचा भाऊ इंग्लंड नव्हे तर ‘या’ देशाकडून खेळणार क्रिकेट, वनडे मालिकेसाठी संघात निवड

एका निवेदनात नॉर्थम्प्टनशायरचे मुख्य प्रशिक्षक जॉन सॅडलर म्हणाले की, “पृथ्वीने त्याच्या छोट्या कार्यकाळात आम्हाला खूप प्रभावित केले आहे. यापुढे तो स्पर्धेत आमच्यासोबत नसणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. तो एक नम्र माणूस आहे आणि नॉर्थॅम्प्टनशायरचे प्रतिनिधित्व करण्याच्या संधीबद्दल खूप कृतज्ञ आहे.”

हेही वाचा – ODI World Cup 2023 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! ‘हा’ प्रमुख खेळाडू संघातून झाला बाहेर

विशेष म्हणजे, वनडे कप २०२३ मध्ये पृथ्वी शॉ सध्या धावा करण्यात आघाडीवर आहे. त्याने ४ सामन्यात ४२९ धावा केल्या आहेत. यादरम्यान ४९ चौकार आणि १९ षटकार मारले आहेत. पृथ्वीचा स्ट्राइक रेट १५२.६७ चा राहीला आहे. सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीतही तो अव्वल आहे. पृथ्वीने २ शतके झळकावली आहेत. पृथ्वीने सॉमरसेटविरुद्ध झंझावाती द्विशतक झळकावले होते. त्याने १५३ चेंडूत २४४ धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीत २८ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता.

हेही वाचा – World Cup 2023: विश्वचषक सामन्यांच्या तिकिटांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया?

पृथ्वी शॉ बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. जुलै २०२१ मध्ये तो भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. पृथ्वीने डिसेंबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यानंतर तो टीम इंडियात पुनरागमन करू शकला नाही. पृथ्वीने त्याच्या फॉर्मबाबत बराच काळ संघर्ष केला. पण एकदिवसीय चषकात तो फॉर्मात दिसला होता. त्याने द्विशतकही झळकावले होते. मात्र, तो फॉर्ममध्ये परतल्यावर दुखापतीने त्याचा त्रास वाढवला. आता तो एकदिवसीय चषकातून बाहेर पडला आहे.

Story img Loader