Prithvi Shaw heart breaking reaction after getting dropped from Mumbai Team : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यासाठी २०२४ हे वर्ष खूपच वाईट गेले आहे. शॉ हा बऱ्याच काळापासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर राहिला आहे. यानंतर आता इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ मधून देखील त्याचा पत्ता कट झाला आहे. इतकेच नाही तर आता विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ साठीच्या मुंबई संघातूनही त्याला डच्चू देण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी मुंबईची संघ जाहीर झाल्यानंतर पृथ्वी शॉने सोशल मिडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वीच मुंबईने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली सैयद मुश्ताक अली ट्रॉफी ही स्पर्धा जिंकली आहे. त्या संघात पृथ्वी शॉ याचादेखील समावेश होता. मात्र या स्पर्धेनंतर अय्यरने पृथ्वी शॉबद्दल बोलताना, त्याला त्याच्या कामच्या नैतिकतेवर (work ethics) मेहनत घेण्याची गरज असल्याचे म्हटले होते. दरम्यान मुंबईच्या संघाने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या तीन फेऱ्यांसाठी आपल्या १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये पृथ्वी शॉ याचे नाव वगळण्यात आले आहे. यानंतर शॉने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत.

पृथ्वी शॉ काय म्हणाला?

पृथ्वी शॉने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या स्टोरीमधी निराशा व्यक्त केली आहे. तो म्हणाला आहे की, “देवा मला सांग, मला अजून काय पाहावे लागेल? जर ६५ डावांमध्ये ५५.७ च्या सरासरीने आणि १२६ च्या स्ट्राइक रेटने (विजय हजारे स्पर्धेत) ३३९९ धावा करूनही मी पुरेसा योग्य नाही. पण माझा तुझ्यावरील विश्वास कायम असेल आणि आशा आहे की माझ्याबद्दल लोकांना अजूनही विश्वास वाटत असेल… कारण मी नक्की पुनरागमन करेल… ओम साई राम”.

शॉने भारतासाठी ५ कसोटी सामने, ६ एकदिवसीय सामने आणि एक आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला आहे. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२१ मध्ये खेळला होता त्यानंतर तो भारतीय संघात पुनरागमन करू शकलेला नाही.

हेही वाचा >> IND vs AUS: आकाशदीपचा गगनचुंबी षटकाराने खुद्द विराटला केलं चकित, भन्नाट प्रतिक्रिया देत कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये मारली उडी; VIDEO व्हायरल

विजय हजारे ट्रॉफी या स्पर्धेला २१ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिल्या तीन सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या १७ सदस्यीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर याच्याकडे असणार आहे. भारताचा टी२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचा देखील या संघात समावेश आहे. मुंबई २१ डिसेंबर रोजी अहमदाबादमध्ये कर्नाटकविरुद्ध स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळणार आहे.

मुंबई संघात कोण कोण आहे?

संघ : श्रेयस लियर (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगक्रिश रघुवंशी, जय बिस्ता, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे, प्रसाद पवार (विकेट किपर), अथर्व अंकोलेकर, तनुष कोटियन, शार्दुल ठाकूर, रोयस्टन डायस, जुनेद खान, हर्ष तन्ना, विनायक भोर.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithvi shaw heart breaking reaction after getting dropped from mumbai team vijay hazare trophy squad rak