Prithvi Shaw’s Third Double Century in List A Cricket: भारतीय फलंदाज पृथ्वी शॉने बुधवारी, ९ ऑगस्ट २०२३ रोजी नॉर्थहॅम्प्टनमधील काउंटी ग्राउंडवर सॉमरसेटविरुद्ध वनडे कप स्पर्धेत नॉर्थहॅम्प्टनशायरसाठी द्विशतक ठोकले. नॉर्थम्प्टनशायरसाठी तिसऱ्या सामन्यात सलामी देताना पृथ्वी शॉने ८१ चेंडूंमध्ये (१४ चौकार, २ षटकार) शतक झळकावले. पृथ्वी शॉने १२९व्या चेंडूवर द्विशतक पूर्ण केले. त्याने आपल्या द्विशतकात २४ चौकार आणि ८ षटकार लगावले. पृथ्वी शॉने या द्विशतकाच्या जोरावर लिस्ट ए क्रिकेटमध्ये विक्रमांची रांग लावली आहे.
पृथ्वी शॉचे मागील द्विशतक २०२०-२१ विजय हजारे ट्रॉफीमध्ये झळकावले होते. त्याने पुद्दुचेरीविरुद्ध मुंबईसाठी नाबाद २२७ धावांची खेळी केली होती. त्यावेळी स्पर्धेतील ही सर्वोच्च धावसंख्या होती. आता पृथ्वी शॉ नॉर्थहॅम्प्टनशायरच्या डावाच्या ५० व्या षटकात १५१ चेंडूत २८ चौकार आणि ११ षटकारांसह २४४ धावा केल्यानंतर बाद झाला. पृथ्वी शॉच्या खेळीमुळे नॉर्थहॅम्प्टनशायरला वन डे चषकात त्यांची दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारण्यात मदत झाली. नॉर्थहॅम्प्टनशायरने ५० षटकांत ८ गडी गमावून ४१५ धावा केल्या.
पृथ्वी शॉने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ५०+ च्या सरासरीने २९०० हून अधिक धावा केल्या आहेत –
पृथ्वी शॉने आतापर्यंत ५६ लिस्ट ए सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५०पेक्षा जास्त सरासरीने २९०० हून अधिक धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २० वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉ गेल्या आठवड्यात पदार्पणाच्या सामन्यात ग्लॉस्टरशायरविरुद्ध ३४ धावांवर आऊट झाला होता.
हेही वाचा – चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा; भारताचे पाकिस्तानवर वर्चस्व; गुणतालिकेत अव्वल
पृथ्वी शॉने केलेल्या विक्रमांची यादी –
पृथ्वी शॉने त्याची सर्वोच्च लिस्ट ए धावसंख्या (२४४ धावा) उभारली. वनडे कपमध्ये द्विशतक झळकावणारा पृथ्वी शॉ तिसरा फलंदाज ठरला.
पृथ्वी शॉच्या नावावर वनडे कपमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आहे. त्याने ऑली रॉबिन्सनचा २०६ (२०२२ मध्ये केंटसाठी) विक्रम मोडला.
पृथ्वी शॉ लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार (३९ चौकार (२८ चौकार, ११ षटकार) मारणारा तिसरा फलंदाज ठरला.
पृथ्वी शॉची २४४ ही इंग्लिश लिस्ट ए क्रिकेटमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. अली ब्राऊन पहिल्या क्रमांकावर आहे. अली ब्राउनने २००२ मध्ये चेल्तेनहॅम आणि ग्लॉसेस्टर ट्रॉफीमध्ये २६८ धावा केल्या होत्या.
पृथ्वी शॉने वनडे कपमध्ये नॉर्थहॅम्प्टनशायरच्या फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम करताना सैफ जबला (१३६) मागे टाकला.
रोहित शर्मानंतर लिस्ट ए मध्ये सर्वाधिक द्विशतके झळकावणारा पृथ्वी शॉ हा दुसरा भारतीय आणि एकूण चौथा खेळाडू आहे. रोहित शर्माने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ३ द्विशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर अली ब्राउन आणि ट्रॅव्हिस हेड यांनी २-२ वेळा द्विशतके झळकावली आहेत.
पृथ्वी शॉने वनडे कपमध्ये चेतेश्वर पुजाराचा भारतीयाकडून सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला.
पृथ्वी शॉने भारताच्या सौरव गांगुलीच्या१८३ (श्रीलंकेविरुद्ध १९९९ मध्ये) इंग्लंडमध्ये भारताकडून सर्वाधिक लिस्ट ए धावसंख्या उभारत मागे टाकले.