Team India’s young batsman Prithvi Shaw: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ सध्या त्याच्या कारकिर्दीतील खराब फॉर्ममधून जात आहे. लहान वयातच आपल्या कर्णधारपदाखाली भारताला अंडर-१९ विश्वचषक जिंकून देणारा शॉ आजकाल भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खूप संघर्ष करताना दिसत आहे.
२३ वर्षीय खेळाडू नुकतेच दुलीप ट्रॉफी २०२३ च्या अंतिम फेरीत सहभागी झाले होते, जिथे त्याने पश्चिम विभागासाठी पहिल्या डावात अर्धशतक झळकावले होते, परंतु दुसऱ्या डावात तो कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे प्रियांक पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील संघाला दक्षिण विभागाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट संघाबाहेर असल्याबद्दल पृथ्वी शॉने मोठे वक्तव्य केले आहे. शॉ म्हणतो की, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याची निवड का करण्यात आली नाही याची आपल्याला कल्पना नाही आणि संघ जाहीर झाला तेव्हा तो खूप दुःखी होता.
पृथ्वी शॉने मोठे वक्तव्य केले आहे –
क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वी शॉ म्हणाला, “जेव्हा मला भारतीय संघातून वगळण्यात आले. तेव्हा मला त्याचे कोणतेही कारण समजले नाही. फिटनेस असू शकतो असे कोणी म्हणत होते, पण मी एनसीएमधील सर्व फिटनेस टेस्ट पास केल्या होत्या. मी धावा केल्या आणि टी-२० संघात स्थान मिळवले, पण वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर संघात स्थान न मिळाल्याने मी खूप नाराज होतो. मी याबद्दल कोणाशीही भांडू शकत नाही, मी काहीही करू शकत नाही, तुम्ही फक्त पुढे जा.”
हेही वाचा – MLC 2023: वयाच्या ३९ व्या वर्षी फाफ डू प्लेसिस बनला सुपरमॅन, घेतला आश्चर्यकारक झेल, पाहा VIDEO
शॉ पुढे म्हणाला, “लोक माझ्याबद्दल खूप बोलतात, पण जे मला ओळखतात त्यांना मी कसा आहे हे समजते. मला मित्र नाहीत, पण मला मैत्री करायला आवडत नाही. नव्या पिढीसोबत हेच घडत आहे, त्यांना आपले विचार इतर कोणाशीही सांगता येत नाहीत. मला हे करताना भीती वाटते, सोशल मीडियावर कधी येईल माहीत नाही. म्हणून, मी फक्त काही गोष्टी शेअर करतो.”
पृथ्वी शॉची कारकीर्द अशीच राहिली आहे –
२३ वर्षीय पृथ्वी शॉने भारतासाठी आतापर्यंत पाच कसोटी, ६ एकदिवसीय आणि एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. शॉच्या कसोटीत ३३९ धावा, एकदिवसीय सामन्यात १८९ धावा आणि टी-२० सामन्यात शून्य धावा आहेत. शॉ त्याच्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शून्यावर बाद झाला होता.