Asia Cup 2022 IND vs PAK: आशिया चषक स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणाऱ्या या सामन्यासाठी केवळ दोन्ही देशातीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. भारत- पाकिस्तान सामन्यासाठी केवळ सामान्य नागरिक नव्हे तर राजकारणी, सेलिब्रिटी एकूण एक व्यक्ती वाट पाहात असतो. देशात रोज एकमेकांवर कुरघोडी करण्याची वाट पाहणारे राजकारणी सुद्धा भारताचे चौकार षटकार एकत्र साजरे करतात. अशीच एक आठवण सध्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शेअर केली असून सोबतच टीम इंडियाला आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये प्रियंका गांधी वड्रा यांनी संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे असे म्हणत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. पुढे प्रियंका म्हणतात की, ” भारत पाकिस्तान सामन्याविषयी माझी खूप खास आठवण आहे. खूप वर्षांपूर्वी मी कराचीला भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी गेलो होतो. भारतीय संघाने सामना जिंकला तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही. काँग्रेस-भाजपचे सर्व नेते आनंदाने उड्या मारत होते. (IND vs PAK T20 Asia Cup 2022: भारताच्या जिव्हारी लागलेला ‘तो’ पराभव, आजही…पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमचा Video चर्चेत)

प्रियांका गांधी व्हिडीओ

Asia Cup 2022: पाकिस्तानी क्रिकेटपटुंच्या ‘या’ सुंदर पत्नी सोशल मीडियावर हिट; फोटो पाहिलेत का?

आज, २८ ऑगस्ट रोजी भारत व पाकिस्तानचा सामना संध्याकाळी ७. ३० वाजता सुरु होणार आहे. देशभरात या सामन्याची उत्सुकता पाहायला मिळतेय. विश्वचषक २०२१ मध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणारे औत्सुक्याचे ठरणार आहे.