पीटीआय, चेन्नई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Pro Chess League भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराथीने प्रो बुद्धिबळ लीगच्या सामन्यात नॉर्वेचा दिग्गज मॅग्नस कार्लसनला पराभूत करत सर्वाचे लक्ष वेधले. विदितचा कार्लसनवरील हा पहिला विजय आहे.

‘इंडियन योगीज’कडून खेळणाऱ्या गुजराथी ने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या कार्लसनकडून करण्यात आलेल्या चुकांचा फायदा उचलला. कार्लसन प्रो बुद्धिबळ लीगमध्ये ‘कॅनडा चेसब्रास’कडून खेळत आहे. जगभरातील १६ संघांनी या ‘ऑनलाइन’ जलद बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. गुजरातीने काळय़ा प्याद्यांसह खेळताना आपल्या प्रतिस्पर्धीवर विजय नोंदवला. पाच जागतिक जेतेपद मिळवणाऱ्या कार्लसनला पराभूत केल्यानंतर गुजराथीने ‘ट्वीट’ केले की, ‘‘आताच जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत केले.’’

कार्लसनला पराभूत केल्यानंतर गुजराथी भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद, डी गुकेश आणि अर्जुन एरिगेसी यांच्या यादीत सहभागी झाला आहे. भारताच्या तिन्ही बुद्धिबळपटूंनी २०२२ मधील विविध स्पर्धामध्ये कार्लसनला नमवले होते.