प्रो कबड्डी लीग 2018तील सहाव्या पर्वामध्ये आज यू मुंबा आणि पुणेरी पलटन यांच्यात रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला हा रंगतदार सामना 32-32 असा बरोबरीत संपला. या सत्रातील हा दुसराच सामना होता. यू मुंबाकडून सिध्दार्थ देसाईने उत्कृष्ट खेळ करताना 14 गुणांची कमाई केली, याशिवाय फजल अत्रचली आणि धर्मराज चेरालाथन यांनी दमदार बचावात्मक खेळ सादर करताना आपल्या संघासाठी 4-4 गुण मिळवले. पुणेरी पलटनकडून नितीन कुमारने 15 गुणांची कमाई केली, त्याला मोनूने चांगली साथ देत 5 गुण कमावले आणि पुण्याचा संघ सामना बरोबरीत सोडवण्यात यशस्वी झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in