अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत सहाव्या हंगामात मैदानात उतरलेल्या यू मुम्बाने आपल्या आतापर्यंतच्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकीत व्हायला भाग पाडलं आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या हरयाणा स्टिलर्स संघाचा यू मुम्बाने 53-26 ने धुव्वा उडवला. यू मुम्बाकडून चढाईपटूंनी केलेला आक्रमक खेळ व त्याला बचावपटूंनी दिलेली सर्वोत्तम साथ यापुढे हरयाणाचा संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही. संपूर्ण सामन्यात हरयाणा स्टिलर्सचा संघ 4 वेळा सर्वबाद झाला. प्रो-कबड्डीच्या इतिहासातला यू मुम्बाचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हरयाणाच्या खेळाडूंनी आजच्या सामन्यात पुरती निराशा केली. विकास कंडोलाचा अपवाद वगळता एकही चढाईपटू आणि बचावफळीतला खेळाडू आजच्या सामन्यात आपली छाप पाडू शकला नाही. यंदाच्या हंगामात सर्वात महागडा खेळाडू ठरलेला मोनू गोयतही यू मुम्बाचा कर्णधार फजल अत्राचलीचा शिकार ठरला. या निराशाजनक खेळामुळे हरयाणाचा संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : उत्तर प्रदेशचे योद्धे तेलगू टायटन्सकडून पराभूत

दुसरीकडे यू मुम्बाच्या खेळाडूंनी अष्टपैलू खेळ केला. चढाईमध्ये अभिषेक सिंहने सर्वाधीक 14 गुणांची कमाई केली. त्याला रोहित बालियान आणि सिद्धार्थ देसाईने 8-8 गुण मिळवत चांगली साथ दिली. या तिन्ही खेळाडूंनी हरयाणाच्या बचावफळीला खिंडार पाडलं, ज्यानंतर हरयाणाचा संघ सावरुच शकला नाही. बचावफळीत कर्णधार फजल अत्राचलीने 7 गुण मिळवले. हरयाणाच्या मुख्य चढाईपटूंना मैदानाबाहेर ठेवण्याची यू मुम्बाची रणनिती या सामन्यात कामी आली. फजलला इतर खेळाडूंचीही चांगली साथ मिळाली.