घरच्या मैदानावर दमदार कामगिरीने प्रभावित करणाऱ्या यू मुंबा संघाने कोलकाताच्या मैदानावरही विजयी परंपरा कायम राखली. यू मुंबाने बंगाल टायगर्सवर ३८-२९ अशी मात केली. यू मुंबातर्फे अनुप कुमारने चढाई करताना १४ गुण पटकावत या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. शबीर बापू शरफुधीनने ८ गुण मिळवत अनुपला चांगली साथ दिली. बंगालच्या संघातून खेळणाऱ्या कोरियाच्या जंग कुन ली या चढाईपटूला रोखण्यासाठी अचूक डावपेच आखत यू मुंबाने बाजी मारली. बंगाल टायगर्सतर्फे नितीन मदनेने १३ गुणांसह शानदार प्रयत्न केले. या दणदणीत विजयासह यू मुंबा संघाचे २३ गुण झाले आहेत आणि त्यांनी गुणतालिकेत भक्कम आघाडी घेतली आहे.
अभिषेक बच्चन सहमालक असलेल्या जयपूर पिंक पँथर्स संघाने प्रो-कबड्डी लीग स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवत आगेकूच केली. पँथर्स संघाने पाटणा पायरेट्सचा ४०-१८ असा धुव्वा उडवला. मनिंदर सिंगने चढाई करताना १३ गुणांसह जयपूरच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. मनिंदरलाच सामन्यातील सर्वोत्तम चढाईपटू पुरस्काराने गौरवण्यात आले. जयपूरने मध्यंतराला २२-६ अशी आघाडी घेतली. ही आघाडी सातत्याने वाढवत त्यांनी शानदार विजय मिळवला. राजेश नरवालने सहा गुण मिळवत मनिंदरला चांगली साथ दिला. या विजयासह जयपूरचे तीन सामन्यात १० गुण झाले असून पाटणाकडे सहा गुण आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे पलटण संघात केनियाचा कबड्डीपटू
कोलकाता : प्रो-कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटण संघात केनियाच्या सायमन मैना किबुरा याचा समावेश करण्यात आला आहे. प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळणारा आफ्रिकन देशांमधील तो एकमेव कबड्डीपटू ठरला आहे. थाळीफेकपटू आणि धावपटू असलेला सायमन हा मित्राकडून कबड्डीचे धडे शिकल्यानंतर कबड्डीच्या प्रेमात पडला.