प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या टप्प्याला २५ जूनपासून पुण्यात प्रारंभ होणार असून, अंतिम फेरीचा सामना ३१ जुलला हैदराबादला होणार आहे.
स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डीचे तीन हंगाम यशस्वी झाल्यानंतर चौथ्या हंगामात आठ संघांनिशीच ती रंगणार आहे. पुण्यात २५ ते २८ जून या कालावधीत पहिला टप्पा रंगणार आहे, तर त्यानंतर जयपूर, हैदराबाद, पाटणा, बंगळुरू आणि कोलकाता येथे सामने होणार आहेत. त्यानंतर २० ते २३ जुलै या कालावधीत मुंबईतील टप्पा रंगणार आहे. मग साखळीतील अखेरचा टप्पा नवी दिल्लीत होणार आहे. २९ जुलैला दोन्ही उपांत्य सामने होतील, तर ३१ जुलैला तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा सामना होईल आणि मग अंतिम विजेता चषक उंचावेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi final in hyderabad