प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात आज यू मुम्बाच्या संघाने दबंग दिल्लीवर ३६-२२ अशी एकतर्फी मात करत आपला दुसरा विजय मिळवला. आजच्या सामन्यात यू मुम्बाच्या बचावफळीने खूप चांगली कामगिरी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. पहिले दोन सामने यू मुम्बाचा बचाव चांगला खेळ करत नव्हता, त्यामुळे अनुप कुमारच्या संघासाठी ही मोठी चिंतेची बाब बनली होती. मात्र अखेर आजच्या सामन्यात मुम्बाची बचावफळी अखेर फॉर्मात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दबंग दिल्लीच्या संघाला कामगिरीतल्या सातत्याने पुन्हा एकदा दगा दिला. रेडींग आणि डिफेन्स या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये दिल्लीचा संघ एक होऊन खेळला नाही. त्यामुळे यू मुम्बाच्या संघाने याचा फायदा उचलत सामन्यात दोन वेळा दबंग दिल्लीला ऑलआऊट करत बाजी मारली.

मुम्बाच्या बचावफळीला आज सूर सापडला –

पहिल्या दोन सामन्यांमध्ये मुम्बाची बचावफळी ही त्यांच्यासाठी चिंतेचा विषय बनली होती. मात्र आजच्या सामन्यात उजवा कोपरारक्षक सुरिंदर सिंह, राईट कव्हर डी.सुरेश कुमार, लेफ्ट कव्हर कुलदीप सिंह यांनी एकत्र मिळून ९ पॉईंट मिळवले. सुरिंदर सिंहची आजच्या सामन्यातली कामगिरी वाखणण्याजोगी होती. सुरिंदरने आज निडर खेळ करत, दिल्लीच्या अनेक रेडर्सना अँकल होल्ड, डॅश करत मुम्बाला चांगले पॉईंट मिळवून दिले. सुरिंदरने दिल्लीच्या आनंद पाटीलला केलेलं टॅकल हे इतकं मजबूत होतं की आनंद पाटीलला यानंतर वैद्यकीय मदत घ्यावी लागली.

दुसऱ्या बाजूने अनुभवी सुरेश कुमार आणि अष्टपैलू कुलदीप यादव यांनीही आज डिफेन्समध्ये चांगले पॉईंट मिळवले. महत्वाची गोष्ट म्हणजे डावा कोपरारक्षक जोगिंदर नरवाल जखमी होऊन बाहेर गेल्यानंतर सुरेश कुमारने आपला अनुभव पणाला लावत मुम्बाला काही महत्वाचे पॉईंट मिळवून दिले.

शब्बीर बापू फॉर्मात, अनुप कुमारचा संयमी खेळ –

यू मुम्बाचा भरवशाचा रेडर मानला जाणाऱ्या शब्बीर बापूला आजच्या सामन्यात सूर सापडला. रेडींगमध्ये शब्बीर बापूने ७ पॉईंट मिळवत आपण फॉर्मात आल्याचं दाखवून दिलं. महत्वाची गोष्ट म्हणजे २ ‘डू ऑर डाय’ रेडमध्ये शब्बीर बापूने दिल्लीच्या बचावफळीत खिंडार पाडत संघाला आघाडी मिळवून देण्यात मदत केली. मुम्बाचा कर्णधार अनुप कुमारसाठी शब्बीर बापू फॉर्मात येणं हा खूप मोठा दिलासा मानला जातोय.

सामन्यात दुसऱ्या सत्रामध्ये दिल्लीच्या खेळाडूंनी चांगला खेळ करत मुम्बावर ऑलआऊट होण्याची नामुष्की आणली होती. मात्र कर्णाधार अनुप कुमारने महत्वाच्या रेडमध्ये दोन खेळाडूंना आऊट करत संघासाठी एक बोनस पॉईंटही मिळवाल. अनुप कुमारच्या या रेडमुळे मुम्बा ऑलआऊट होता होता वाचली.

मिराज शेख, निलेश शिंदेची झुंज, दिल्लीच्या इतर खेळाडूंची निराशा –

कामगिरीतल्या सातत्याच्या अभावाचा फटका आजच्या सामन्यात दबंग दिल्लीला बसला. कालच्या सामन्यात हिरो ठरलेला आनंद पाटील या सामन्यात अपयशी ठरला. कर्णधार मिराज शेखला प्रशिक्षक भेंडीगिरी यांनी पहिल्या सत्रात संघाबाहेर ठेवलं होतं, मात्र दुसऱ्या सत्रात मिराज संघात आल्यावर त्याने आपल्या रेडींगमध्ये ७ पॉईंट मिळवले. मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही. आर.श्रीरामने काही पॉईंट मिळवले, मात्र दिल्लीला विजय मिळवून देण्यासाठी त्याचे प्रयत्न तोकडेच पडले.

बचावफळीत निलेश शिंदेचा अपवाद वगळता इतर खेळाडूंनाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. बाजीराव होडगे, सुनील यांनी काही चांगले पॉईंट मिळवले…मात्र मुम्बाच्या रेडर्सवर अंकुश ठेवण्यात त्यांना अपयश आलं.

महत्वाचे खेळाडू फॉर्मात आल्यामुळे यू मुम्बासाठी हा विजय आश्वासक मानला जात आहे. मात्र दिल्लीच्या खेळाडूंमध्ये असलेला सातत्याचा अभाव आजच्या सामन्यात त्यांच्या पराभवासाठी कारण ठरला आहे. त्यामुळे आपल्या आगामी सामन्यांमध्ये दिल्लीचा संघ आपल्या चुकांमधून काही शिकतो का हे पहावं लागणार आहे.