प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामासाठी दबंग दिल्लीनेही आपल्या संघात बदल करण्याचं ठरवलं आहे. इराणी अष्टपैलू मिराज शेखऐवजी अनुभवी बचावपटू जोगिंदर नरवालकडे यंदाच्या हंगामाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. प्रो-कबड्डीच्या पहिल्या पर्वापासून दबंग दिल्ली संघाची कामगिरी यथातथाच राहिली आहे. आतापर्यंत दिल्लीचा संघ एकदाही अंतिम ४ जणांच्या गटात पोहचलेला नाहीये. जोगिंदर नरवालने याआधी पुणेरी पलटण, यू मुम्बा, बंगळुरु बुल्स संघाचं प्रतिनिधीत्व केलेलं आहे. त्यामुळे जोगिंदरच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ चांगली कामगिरी करतो का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader