महाराष्ट्राला कबड्डीचं राष्ट्रीय विजेतेपद मिळवून देणाऱ्या रिशांक देवाडीगाकडे यंदा उत्तर प्रदेश योद्धाज संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. ७ ऑक्टोबरपासून प्रो-कबड्डीच्या नव्याकोऱ्या हंगामाला सुरुवात होते आहे. पहिली ४ पर्व यू मुम्बाचं प्रतिनिधीत्व करणारा रिशांक देवाडीगा हा प्रो-कबड्डीतला महत्वाचा चढाईपटू मानला जातो. पाचव्या हंगामात उत्तर प्रदेशच्या संघाने रिशांकला आपल्या संघात सामावून घेतलं. ८० सामन्यांमध्ये रिशांक देवाडीगाने ४४९ गुणांची कमाई केली आहे.
अवश्य वाचा – प्रो-कबड्डीत जयपूर पिंक पँथर्स संघाचं नेतृत्व ‘कॅप्टन कूल’ अनुप कुमारकडे
तिसऱ्या पर्वात रिशांक देवाडीगाने केलेली कामगिरी ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. सहाव्या हंगामात रिशांक देवाडीगाला आपल्या संघात घेण्यासाठी यू मुम्बा आणि उत्तर प्रदेश संघांमध्ये चुरस लागली होती. अखेर उत्तर प्रदेशने यामध्ये बाजी मारत रिशांकला आपल्या संघात कायम राखलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देणारा रिशांक प्रो-कबड्डीत उत्तर प्रदेश योद्धाला विजेतेपद मिळवून देतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवश्य वाचा – मराठमोळ्या गिरीश मारुती एर्नाककडे पुणेरी पलटण संघाचं नेतृत्व