प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगामातील आज अकरावा दिवस आहे. आजच्या तीन सामन्यांपैकी दुसरा आणि या हंगामातील २६ वा सामना बेंगळुरू बुल्स विरुद्ध तेलुगू टायटन्स असा झाला. ही लढतही शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय चुरशीची झाली आणि अखेरीस बरोबरोतच सुटली. त्यामुळे यू मुम्बा आणि यूपी योद्धा यांच्यातील सामान्याप्रमाणे हा बेंगळुरू बुल्स विरुद्ध तेलुगू टायटन्स यांच्यातील सामना देखील अनिर्णितच राहिला. या दोन्ही संघांनी ३४-३४ असे समान गुण मिळवले. या मोसमातील हा सहावा अनिर्णित सामना ठरला आहे. या सामन्यात अंकित बेनिवालने टायटन्ससाठी सुपर 10 पूर्ण केला.
गुणतालिकेनुसार तेलुगु टायटन्ससाठी आजचा विजयी होणं महत्त्वाचं होतं. पण पवन सेहरावतसारख्या जबरदस्त रेडरसह असलेल्या बेंगळुरू बुल्सला हरवणे हे देखील एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हतं.
Pro Kabaddi League 2021 : यू मुंबा आणि यूपी योद्धा यांच्यातील अटीतटीची लढत अखेर अनिर्णित
आजचा पहिला सामना हा यू मुंबा आणि यूपी योद्धा यांच्यात झाला. शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय अटीतटीचा झालेला हा सामना अखेर बरोबरीतच सुटला. संपूर्ण सामन्यातच दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. यू मुम्बासाठी रेडर सुरेंद्र गिलने ८ आणि अजित कुमारने ९ गुण मिळवले. यू मुंबाचा स्टार खेळाडू अभिषेक सिंग आणि यूपीचा डिप किंग प्रदीप नरवालने प्रत्येकी ४ गुण मिळवले.
याचबरोबर आजच्या शेवटच्या आणि २७व्या सामन्यात तामिळ थलायवासचा सामना टेबल टॉपर दबंग दिल्लीशी होणार आहे.