प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगामाचा आजचा अकरावा दिवस आहे. आजच्या तीन सामन्यांपैकी पहिला आणि या हंगामातील २५ वा सामना यू मुंबा आणि यूपी योद्धा यांच्यात झाला. शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय अटीतटीचा झालेला हा सामना अखेर बरोबरीतच सुटला. दोन्ही संघांनी २८-२८ असे समान गुण मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संपूर्ण सामन्यातच दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. यू मुम्बासाठी रेडर सुरेंद्र गिलने ८ आणि अजित कुमारने ९ गुण मिळवले. यू मुंबाचा स्टार खेळाडू अभिषेक सिंग आणि यूपीचा डिप किंग प्रदीप नरवालने प्रत्येकी ४ गुण मिळवले.

हा सामना होण्याअगोदर यू मुंबा या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर होती आणि संघाने एकूण चार सामने खेळलेले होते, ज्यातील दोन सामने जिंकले होते तर, एका सामन्यात पराभव आणि एक सामना अनिर्णित राहिला होता. संघाचे एकूण १४ गुण होते. तर , यूपी योद्धा गुणतालिकेत 9 व्या स्थानावर होता. संघाने ४ पैकी फक्त १ सामना जिंकला आहे, तर २ सामने गमावले आणि १ सामना अनिर्णित राहिलेला होता. यूपी योद्धाला १० गुण होते.

दुसरीकडे, बेंगळुरू बुल्स आणि तेलुगू टायटन्स हे संघ हंगामातील २६ व्या व आजच्या दुसऱ्या सामन्यात आमनेसामने आले आहेत. याचबरोबर आजच्या शेवटच्या आणि २७व्या सामन्यात तामिळ थलायवासचा सामना टेबल टॉपर दबंग दिल्लीशी होणार आहे.

दबंग दिल्ली आणि तमिळ थलायवाजमधील सामनाही बरोबरीत सुटला

दबंग दिल्ली आणि तमिळ थलायवाजमधील सामना देखील ३०-३० असा बरोबरीत सुटला. या सिझनमध्ये आतापर्यंत २७ सामने झालेत. त्यापैकी ७ सामने बरोबरीत सुटले आहेत. नव्या वर्षी पहिल्या दिवशीचे तिन्ही सामने बरोबरीत सुटले. या सामन्यात दिल्लीचा रेडर नवीन कुमारने १५ पॉईंट्स मिळवले. दुसरीकडे थलायवाजचा रेडर मंजीत कुमारने १० पॉईंट्स आपल्या नावावर केले.