प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगामाच्या आजच्या चौथ्या दिवशीचा पहिला सामना हा पाटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा असा झाला. या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या ठरलेल्या सामान्यात अखेर यूपी योद्धाने पाटणा पायरेट्सवर ३६ -३५ असा एका गुणाने विजय मिळवला.

या सामन्यात यूपीचा प्रदीप नरवाल १२ गुण घेत सुपर रेडर ठरला. पाटणा पायरेट्सने शानदार बचाव खेळला पण अखेरच्या क्षणी संघाने एका गुणाने सामना गमावला.

प्रो कब्बडीच्या इतिहासात पाटणा आणि यूपीचे संघ आतापर्यंत एकूण आठ वेळा समोरासमोर आले होते. त्यापैकी चार वेळा पाटणाने बाजी मारली, तर तीन वेळा यूपीचा विजय झाला होता. याशिवाय एक सामना बरोबरोत सुटलेला होता.

पाटणाचा मोनू गोयत आणि यूपी योद्धाचा प्रदीप नरवाल यांच्याकडून कशाप्रकारे आज आपल्या संघांसाठी योगदान दिले जाते, याची देखील सर्वांना उत्सुकता होती. मोनू गोयतने हरियाणा विरोधात धडाकेबाज कामगिरी बजावत १६ गुणांची कमाई केली होती.

आता पुढील सामना हा पुणेरी पलटण विरुद्ध तेलुगू टायटन्स यांच्यात सुरू होत आहे. यानंतर जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स यांच्यात आजचा दिवसाचा शेवटचा सामाना होईल.

Story img Loader