प्रो कबड्डी लीगचा ९वा हंगाम (पीकेएल २०२२) ७ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. तसेच स्पर्धेचा अंतिम सामना डिसेंबर २०२२मध्ये खेळवला जाईल. यंदाची स्पर्धा खूप खास आहे. कारण चाहत्यांना २०१९ नंतर प्रथमच स्टेडियममधून पीकेएलचा आनंद घेता येत आहे. याशिवाय पीकेएल २०२२ चे आयोजन तीन शहरांमध्ये केले जात आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात पुणेरी पलटण संघाने सर्वात दमदार कामगिरी केली आहे.

साखळीतील सर्व सामने बेंगळुरू, पुणे आणि हैदराबाद येथे खेळवले जातील. २७ ऑक्टोबरपर्यंत हे सामने बेंगळुरूमध्ये खेळवले गेले. त्यानंतर पुण्यातील लेग सुरू झाली आहे. शेवटचा टप्पा हैदराबादमध्ये होईल, मात्र त्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मागील ४ हंगामाप्रमाणे या वेळीही या स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पुणेरी पलटण अव्वलस्थानी –

आतापर्यंत झालेल्या सामन्यात पुणेरी पलटणचा संघ अव्वलस्थानी आहे. या संघाने १३ सामन्यात ७ विजय, ४ पराभव आणि २ टायसह ४४ गुण प्राप्त केले आहेत. त्यांच्या पाठोपाठ बेंगळुरू बुल्सचे ४१गुण आहेत, त्यांनी १२ सामन्यात ७ विजय, ४ पराभव आणि १ टायचा सामना केला आहे. जयपूर पिंक पँथर्सचे, यू मुंबा आणि पटणा पायरेट्स संघाचे प्रत्येकी १२ सामन्यात ३८ गुण आहेत. त्याचबरोबर दबंग दिल्ली आणि यूपी योद्धा यांचे अनुक्रमे १२ सामन्यात ३५ गुण आहेत.

तसेच तमिळ थलायवासचे १२ सामन्यात ३४ गुण असून ते आठव्या स्थानी आहेत. बंगाल वॉरियर्सचे ११ सामन्यात ३२ गुण आहेत. हरियाणा स्टीलर्स आणि गुजरात जायंट्सचे अनुक्रमे १३ आणि ११ सामन्यात प्रत्येकी ३१ गुण आहेत. दरम्यान तेलुगू टायटन्सचा संघ गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे. त्यांना १२ सामन्यात फक्त १ विजय मिळवता आला आहे. त्याबरोबर ११ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या संघाचे ९ गुण आहेत. तसेच हा संघ अजून ही आपल्या दुसऱ्या विजयाच्या शोधात आहे.

पीकेएलमध्‍ये विजयी संघाला ५ गुण मिळतात आणि जर पराभूत संघाला ७ किंवा त्यापेक्षा कमी फरक पडतो, तर त्यांनाही सामन्यातून एक गुण मिळतो. तसेच, टाय झाल्यास, दोन्ही संघांना प्रत्येकी ३ गुण मिळतात.

१२ संघ आणि त्याचे कर्णधार –

दबंग दिल्लीचा नवीन कुमार, पाटणा पायरेट्सचा नीरज कुमार, यूपी योद्धाचा नितीश कुमार, बेंगळुरू बुल्सचा महेंद्र सिंग, पुणेरी पलटणचा फजल अत्राचली, गुजरात जायंट्सचा चंद्रन रणजित, जयपूर पिंक पँथर्सचा सुनील कुमार, बंगाल वॉरियर्सचा मनिंदर सिंग, तेलुगू टायटन्सचा रवींद्र सिंग पहल, यू मुंबाचा सुरिंदर सिंग, हरियाणा स्टीलर्सचा जोगिंदर नरवाल आणि तमिळ थलायवासचा पवनकुमार सेहरावत कर्णधार आहेत.

हेही वाचा – Vijay Hazare Trophy 2022 : मुंबई संघाला मोठा धक्का; शिवम दुबे दुखापतीमुळे संघाबाहेर

यावेळी पवन कुमार सेहरावत हा लिलावात विकत घेतलेला सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याने मागील सर्व मोसमातील रेकॉर्ड मोडीत काढले. यावेळी तो तमिळ थलायवासचा एक भाग आहे. तसेच विकास कंडोला बेंगळुरू बुल्सकडून, राहुल चौधरी जयपूर पिंक पँथर्स, जोगिंदर नरवाल हरियाणा स्टीलर्स, दीपक निवास हुडा बंगाल वॉरियर्स, फजल अत्राचली आणि मोहम्मद नबीबक्ष पुणेरी पलटनकडून खेळत आहेत.

Story img Loader