विजयाच्या वाटेवरून बरोबरीत समाधान; जँग कुन लीचा निणार्यक खेळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पहिल्या दहा मिनिटांत लोण पत्करूनही जँग कुन लीच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर जबरदस्त पुनरागमन करणाऱ्या बंगाल वॉरियर्सला बरोबरीवर समाधान मानावे लागले. ४०व्या मिनिटाला ३४-३३ अशा एका गुणाच्या आघाडीवर असलेल्या बंगालच्या कुन लीने पकड करण्यासाठी दाखवलेली घाई महागात पडली. राहुल चौधरीने अखेरच्या चढाईत कुन ली याला बाद करून तेलुगू टायटन्सला बरोबरी साधून दिली. या निकालामुळे बंगालचे स्पध्रेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

तेलुगू टायटन्सने ११व्या मिनिटाला लोण चढवत बंगालवर १३-६ अशी आघाडी घेतली. राहुल चौधरी, निलेश साळुंके व संदीप नरवाल यांनी चढाई आणि पकडीत सातत्यपूर्ण खेळ करत पहिल्या सत्रात १९-१४ असे वर्चस्व राखले. दुसऱ्या सत्रात मात्र जँन कुन लीचा झंझावत अनुभवायला मिळाला. जिम्नॅस्टिकपटूला लाजवेल अशा कसरतींचे प्रदर्शन घडवत तेलुगू टायटन्सची बचावफळी भेदली. कुन लीने १६ चढायांमध्ये ३ बोनस आणि ११ गुण, तर पकडीतही दोन गुणांची कमाई करत सामना चुरशीचा बनवला.

अखेरच्या क्षणापर्यंत एकेक गुणाच्या आघाडीने दोन्ही संघ विजयासाठी झटत होते. ४०व्या मिनिटाला बंगालकडे एका गुणाची आघाडी होती आणि तेलुगू टायटन्सच्या अखेरच्या चढाईत त्यांना वेळ मारून न्यायची होती. मात्र राहुलची पकड करण्याच्या नादात कून ली बाद झाला आणि तेलुगू टायटन्सने ३४-३४ अशी बरोबरी केली. तेलुगू टायटन्सकडून चढाईत राहुल (८) व निलेश साळुंके (१०) यांनी दर्जेदार खेळ केला. त्यांना संदीप नरवाल (६) याने अष्टपैलू खेळ करून उत्तम साथ दिली.

स्टॉर्म क्विन्सचा सहज विजय

महिलांच्या प्रदर्शनीय सामन्यात स्टॉर्म क्विन्सने २१-१५ अशा फरकाने आइस दिवाजचे आव्हान सहज परतवले. दीपिका जोसेफ (५), सोनाली इंगळे (५) व क्षितिज हिरवे (२) यांनी पकडीत उत्तम खेळ केला.

आजचे सामने

तेलुगू टायटन्स वि. दबंग दिल्ली.

बंगाल वॉरियर्स वि. बंगळुरू बुल्स.

सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स