पूर्वार्धात ११-२१ अशा पिछाडीवर पडलेल्या पाटणा पायरट्सने राकेश कुमारच्या शेवटच्या चढाईतील गुणाच्या जोरावर दबंग दिल्ली संघाला ३०-३० असे बरोबरीत रोखले व प्रो-कबड्डी लीगमधील आव्हान राखले. जयपूर पिंक पँथर्स संघानेही पूर्वार्धातील १६-२० अशा पिछाडीवरून तेलुगू टायटन्सला ४९-२९ असे सहज हरविले. दिल्लीने पाटण्याविरुद्ध २१-११ अशी आघाडी घेतली होती. त्या वेळी हा सामना ते एकतर्फीजिंकणार असे वाटले होते. तथापि, उत्तरार्धात सामन्याचा रंग पालटवित पाटण्याच्या खेळाडूंनी जिद्दीने खेळ केला. शेवटच्या मिनिटाला राकेश कुमारने सामना बरोबरीत ठेवला.

Story img Loader