पंचकुला : दीपक नरवालच्या चतुरस्र चढायांच्या बळावर जयपूर पिंक पँथर्सने बेंगळूरु बुल्सचा ४१-३४ असा पराभव केला. दीपकने चढायांचे १६ गुण मिळवले. निलेश साळुंखेने नऊ गुण मिळवून त्याला अप्रतिम साथ दिली. बेंगळूरुकडून पवन शेरावतने चढायांचे १४ गुण मिळवले. परंतु तो संघाचा पराभव टाळू शकला नाही.
दुसऱ्या सामन्यात हरयाणा स्टीर्सने तेलुगू टायटन्सचा ५२-३२ असा पाडाव केला. विकास खंडोलाने नेत्रदीपक चढाया करीत १३ गुण मिळवले. विनय (८ गुण) आणि रवी कुमार (७ गुण) यांनी त्याल अप्रतिम साथ दिली. तेलुगू टायटन्सच्या सिद्धार्थ देसाईने चढायांचे १२ गुण मिळवले.
आजचे सामने
’ यूपी योद्धा वि. दबंग दिल्ली ’ गुजरात फॉच्र्युनजायंट्स वि. पाटणा पायरेट्स
’ वेळ : सायं. ७.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स २,
स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ मराठी.