मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या १०व्या पर्वासाठी पुढे ढकलण्यात आलेला खेळाडूंचा लिलाव आता ९ आणि १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी सध्या भारतीय संघांचे शिबीर सुरू असल्यामुळे लिलाव पुढे ढकलण्यात आला होता.
लिलावासाठी अ, ब, क, ड अशा श्रेणी निश्चित केल्या असून, यामध्ये अष्टपैलू, बचावपटू आणि चढाईपटू अशी विभागणी करण्यात आली आहे. या श्रेणींसाठी अनुक्रमे ३०, २०, १३, ९ लाख अशी मूळ किंमत आहे.