पहिल्यावहिल्या हंगामात क्रीडारसिकांच्या पसंतीला उतरलेल्या प्रो कबड्डी लीगने १८ ते २१ जून या कालावधीत मुंबईच्या एनएससीआय संकुलात होणाऱ्या पहिल्या टप्प्यासाठी कंबर कसली आहे. या चार दिवसांत होणाऱ्या सामन्यांना प्रतिसाद लक्षात घेऊन तिकीटदरांमध्ये वाढ केली आहे, परंतु महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलत देण्यात येणार आहे.
जयपूर पिंक पँथर्स आणि यू मुंबा हे मागील हंगामातील अंतिम फेरीतील दोन संघ १८ जुलैला सलामीच्या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मुंबईतील टप्प्याची तिकीटविक्री मारूश, द मोबाइल स्टोर, स्मॅश आणि एनएससीआय येथे उपलब्ध आहे. शनिवार-रविवारी तीन श्रेणींचे तिकिटांचे दर अनुक्रमे २५०० रु., १००० रु. आणि ८०० रु. असतील, तर बाकीच्या दिवसांसाठी हे दर अनुक्रमे २५०० रु., ९०० रु. आणि ७०० रु. असतील. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ओळखपत्र दाखवून तिसऱ्या श्रेणीचे तिकीट फक्त दीडशे रुपयांना मिळू शकेल.
प्रो कबड्डी लीगचे किमान तिकीट ८०० रुपये
पहिल्यावहिल्या हंगामात क्रीडारसिकांच्या पसंतीला उतरलेल्या प्रो कबड्डी लीगने १८ ते २१ जून या कालावधीत मुंबईच्या एनएससीआय संकुलात होणाऱ्या पहिल्या टप्प्यासाठी कंबर कसली आहे.
First published on: 10-07-2015 at 05:44 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi league tickets cost at least rs