प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात शुक्रवारी खेळल्या गेलेल्या महाराष्ट्राच्या दोन संघांमधील महत्वाच्या लढतीत यु मुंबाने पुणेरी पलटणवर निसटता विजय मिळवला. पुणेरी पलटण विरुद्ध यु मुंबा या महाराष्ट्राच्या संघा दरम्यानच्या महाराष्ट्र डर्बीत यु मुंबाने ३४-३३ अशा फरकाने सामना जिंकला. यासह या हंगामातील दुसरी महाराष्ट्र डर्बी जिंकत मुंबईने १-१ अशी बरोबरी साधली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रो कबड्डी लीगच्या ७१व्या सामन्यात, यु मुंबाने पुणेरी पलटणचा ३४-३३ असा रोमांचकारी पराभव केला आणि गुणतालिकेत सातव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. यु मुंबाचा १२ सामन्यांमधला हा सातवा विजय आहे, तर पुणेरी पलटणचा १३व्या सामन्यातील चौथा पराभव अजूनही अव्वल स्थानावर आहे. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) येथे खेळल्या गेलेल्या दिवसातील दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघांनी विजयाच्या निश्चयाने मैदानात उतरले होते. हंगामातील पहिली महाराष्ट्र डर्बी पुणेरी पलटण संघाने आपल्या नावे केली होती. या सामन्यातही पुणेरी पलटण संघाने खेळला आक्रमक सुरुवात केली. मात्र, मुंबईने अगदी कमी वेळात पलटवार करत पलटण संघाचा एक-एक गडी बाद केला आणि त्यांनी आघाडी मिळवली. पुण्याच्या मोहित गोयतने आधी रेडिंगमध्ये आणि त्यानंतर सुपर टॅकल करत ऑल आउट टाळला. पहिल्या सत्राच्या अखेरीस दोन्ही संघांकडे १५-१५ गुण होते.

पुणेरी पलटणने उत्तरार्धात चांगली कामगिरी करत स्कोअर १९-१६ वर आणला, तथापि, सुपर टॅकलच्या मदतीने यु मुंबाने पुन्हा १९-१९ अशी बरोबरी साधली. मोनू गोयतने एका चढाईत दोन गुण मिळवत गुणसंख्या २२-१९ अशी केली. यानंतर पुणेरी पलटणनेही ३१व्या मिनिटाला यु मुंबाला ऑलआउट केले आणि ब्रेकच्या वेळी ते २५-२० ने पुढे होते. ब्रेकनंतर यु मुंबाने पुन्हा पुनरागमन करत पुणेरी पलटणची आघाडी 35व्या मिनिटाला केवळ एका गुणाने कमी केली आणि स्कोअर २६-२५ असा झाला. यादरम्यान गुमान सिंगनेही सुपर १० पूर्ण केला. ३८व्या मिनिटाला यू मुंबाने पुणेरी पलटणला ऑलआऊट केले आणि स्कोअर ३०-३० असा बरोबरीत राहिला. यु मुंबानेही पुढच्याच मिनिटाला सामन्यात आघाडी घेतली. शेवटच्या चढाईपूर्वी स्कोअर ३३-३३ असा बरोबरीत होता, पण शेवटच्या डू आणि डायच्या चढाईत आशिषने एक गुण मिळवत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

हेही वाचा :  T20 WC 2022: ‘धोनीचा चॅम्पियन संघ आणि रोहितचा भारतीय संघ यांच्यात मोठा फरक…’ गौतम गंभीरची सडकून टीका 

यु मुंबासाठी गुमान सिंगने सामन्यात १३ रेड पॉइंट घेतले. रिंकूने बचावात चार टॅकल पॉइंट घेतले. मोहित गोयतने पुणेरी पलटणसाठी सुपर १० मारला आणि त्याला १० रेड आणि तीन टॅकल पॉइंट मिळाले. पुणेरी पलटणचा कर्णधार फजल अत्राचली या सामन्यात वाईटरित्या फ्लॉप झाला आणि त्याला एकही गुण मिळवता आला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi league u mumba avoids defeat in second match of maharashtra derby puneri paltans thrashing avw
Show comments