सध्या प्रो कबड्डी लीगच्या नववा हंगाम सुरु असून शुक्रवारी तीन सामने खेळले गेले. त्यातील पहिल्या सामन्यात यु मुंबाने शेवटच्या क्षणी बाजी पलटवत हरियाणा स्टीलर्सला ३२-३१ असे पराभूत केले. तर दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटणने विजयी घोडदौड कायम ठेवत बंगालला २७-२५ असे पराभूत करत गुणतालिकेत थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बंगाल वॉरियर्सने पहिल्या पूर्वार्धात १५-११ अशी आघाडी घेतली. बंगाल वॉरियर्सचा कर्णधार मनिंदर सिंग याने सामन्याची चांगली सुरुवात केली आणि लगेचच त्याने जबरदस्त सुपर राइडचा करत ४ गुणांची आघाडी घेतली. त्याने २ जणांना बाद करत ती रेड गाजवली. मात्र, पुणेरी पलटणने शानदार पुनरागमन करत बंगालवर दडपण आणले. यामुळे तो त्याला ऑलआऊट करण्याच्या अगदी जवळ आला. वॉरियर्सला मनोज आणि गिरीश मारुती एरनाक यांनी वाचवले आणि याच कारणामुळे पूर्वार्धानंतर बंगाल आघाडीवर होता. त्यांच्यासाठी कॅप्टन मनिंदर सिंगने सर्वाधिक ५ रेड पॉइंट आणि गिरीश मारुती एरनाकने बचावात ३ टॅकल पॉइंट्स मिळवले.

पुणेरी पलटणकडून मोहित गोयतने सर्वाधिक ४ गडी बाद  करत गुणांमधील अंतर कमी केले. तर सोंबीरला बचावात दोन टॅकल पॉइंट मिळाले. दुसऱ्या हाफची सुरुवात अतिशय संथ झाली आणि रेडर्स एकदम शांत दिसत होते. या कारणास्तव, सामना फक्त करा आणि मरो वर गेला. पुण्याने योग्य वेळ साधत बंगाल वॉरियर्स ऑलआऊट केले. मनिंदर सिंगला कामगिरीमुळे पुणे संघाला पुनरागमन करता आले. सामन्याच्या ३६व्या मिनिटाला, फजल अत्राचलीच्या सुरेख टॅकलमुळे पुण्याने बंगालला प्रथमच ऑलआऊट केले. मनिंदर सिंगला बाद करत फजलने मोसमातील पहिला हाय ५ पूर्ण केला.

हेही वाचा :   आशिया चषक २०२३ साठी भारत पाकिस्तानला जाणार का? यावर रोहित शर्माचे मोठे विधान, जाणून घ्या

महाराष्ट्राच्या संघांनी पहिल्यांदाच मैदानात उतरत असलेल्या यु मुंबाने या सामन्यात संथ सुरुवात केली. आक्रमक सुरुवात करणारा हरियाणा स्टीलर्स पहिल्या हाफच्या अखेरीस आघाडीवर होता. मात्र, मुंबईने त्यानंतर अचानक वेग पकडला. गुमान सिंग याने रेडींगची जबाबदारी घेतली. सुरेंदर सिंगने कर्णधाराला साजेसा खेळ करत डिफेन्समध्ये ६ गुणांची कमाई केली. हरेंदर व जय भगवान यांनी त्याला सुरेख साथ दिली. अखेरच्या रेडआधी बरोबरीत असलेल्या या सामन्यात मुंबईने अखेरीस ३२-३१ अशा विजयाची नोंद केली. हरियाणाचा सलग दुसऱ्या सामन्यात अखेरचा रेडमध्ये पराभव झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi league u mumba puneri paltans winning streak continues puneri paltan jump straight to third position in points table avw