प्रो कबड्डी लीग
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
प्रो कबड्डी लीग
प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात मंगळवारी झालेल्या लढतीत बेंगळूरु बुल्सने बाद फेरी गाठली, तर जयपूर पिंक पँथर्सनेदेखील महत्त्वपूर्ण विजय मिळवून बाद फेरीच्या शर्यतीतील आव्हान टिकवून ठेवले. पहिल्या सामन्यात बेंगळूरुने तेलुगू टायटन्सला ४४-२८ अशी आरामत धूळ चारून ‘ब’ गटातून आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे. १९ सामन्यांतील १२ विजय मिळवणाऱ्या बेंगळूरुसाठी पवन शेरावतने सर्वाधिक १३ चढायांचे गुण मिळवले. रोहित कुमारनेदेखील सात गुण मिळवले. दुसऱ्या सामन्यात जयपूरने दीपक हुडाच्या चढायांच्या १२ गुणांच्या बळावर हरयाणा स्टीलर्सवर ३९-३० अशी सरशी साधली.