प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात हरयाणाच्या सोनिपत शहरात होत असलेल्या सामन्यांमध्ये बंगाल वॉरियर्सने अटीतटीच्या लढतीत तेलगू टायटन्सवर मात केली. 30-25 च्या फरकाने सामन्यात बाजी मारत बंगालने यंदाच्या हंगामात आपला संघ विजेतेपदाच्या उद्देषाने मैदानात उतरला असल्याचं दाखवून दिलं.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : मराठी बचावपटू ठरले High 5

संपूर्ण सामन्यात दोन्ही संघ हे बचावात्मक पवित्र्यात खेळले, त्यामुळे या सामन्याची गुणसंख्या 30 च्या वर जाऊ शकली नाही. बंगालकडून चढाईपटू मणिंदर सिंहने केलेल्या चढाया या बंगालच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरल्या. मणिंदरने चढाईत 11 गुणांची कमाई केली. त्याला श्रीकांत तेवतिया, महेश गौड आणि बचावफळीतल्या खेळाडूंनी उत्तम साथ दिली.

दुसरीकडे तेलगू टायटन्सच्या भरवशाच्या खेळाडूंनी मात्र आजच्या सामन्यात पुरती निराशा केली. राहुल चौधरीला आजच्या सामन्यात फक्त 2 गुण कमावता आले. मराठमोळ्या निलेश साळुंखेने 6 गुणांची कमाई करत झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला इतर खेळाडूंनी साथ लाभली नाही. तेलगू टायटन्सच्या बचावफळीने सामन्यात काही चांगले गुण कमावले, मात्र चढाईपटूंच्या निराशाजनक खेळामुळे त्यांच्या कामगिरीवर पाणी फिरलं.

Story img Loader