प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने आपला विजयी धडाका कायम ठेवला आहे. नोएडात सुरु असलेल्या सामन्यांमध्ये गुजरातने दबंग दिल्ली संघाची झुंज 45-38 अशी मोडून काढली. कोरियाचा चढाईपटू डाँग जिऑन लीने गुजरातकडून चढाईमध्ये 10 गुणांची कमाई करत दिवस गाजवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या सत्रापासून गुजरातने सामन्यावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं. दबंग दिल्लीच्या अनुभवी बचावफळीला खिंडार पाडत गुजरातच्या चढाईपटूंनी गुण मिळवण्याचा सपाटा लावला. डाँग ली, रोहित गुलिया, सचिन तवंर यांनी गुजरातला पहिल्या सत्रात मोठी आघाडी मिळवून दिली. या तिन्ही खेळाडूंवर नियंत्रण ठेवणं दिल्लीच्या बचावफळीला जमलं नाही. गुजरातच्या बचावपटूंनीही आपल्या चढाईपटूंना मोलाची साथ दिली. या खेळाच्या जोरावर गुजरातने पहिल्या सत्राअखेरीस 27-18 अशी आघाडी घेतली.

दिल्लीकडून चंद्रन रणजीत, नवीन कुमार आणि बदली खेळाडू पवन कादीयान यांनी चढाईत गुजरातला चांगली टक्कर दिली. मात्र दिल्लीच्या बचावफळीने आजच्या सामन्यात पुरती निराशा केली. रविंदर पेहल, जोगिंदर नरवास, विशाल माने आजच्या सामन्यात आपला प्रभाव पाडू शकले नाहीत. या कमकुवत बचावाचा आधार घेऊनच गुजरातने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.